You are currently viewing त्या वेळी सिंधुदुर्गात फिरायला शिवसेना नेत्यांना घाम फुटायचा!!!

त्या वेळी सिंधुदुर्गात फिरायला शिवसेना नेत्यांना घाम फुटायचा!!!

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब

शिवसेनेचे आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. सेनेचे नेते पण आयोध्याला आधीच पोहोचले आहेत. त्याठिकाणी सेना नेते आपण दौऱ्याला येऊन दाखवलं! आपण असली हिंदुत्ववादी आहोत वैगरे बाता मारत आहेत . शरयू नदीकाठी राज ठाकरे यांना विरोध करणाऱ्या बृजभूषण भैय्या खासदाराला देखील भेटणार आहेत. तर बृजभूषण ने देखील सेना नेत्यांचे आपण स्वागत करत असल्याचे सांगितले आहे. एकंदरीत पहाता यातून हिंदुत्ववादी म्हणून हा दौरा नसून ,राज ठाकरे आणि मनसे दौरा करू शकले नाहीत.पण आपण या दौऱ्यावर गेलो हे दाखवण्याचा हा सर्व खटाटोप आहे .अयोध्ये मधून माध्यमांसमोर येणाऱ्या सेना नेत्यांनी आपल्या मनाला विचारावं जेव्हा 2005 साली सिंधुदुर्ग जिल्हामध्ये विधानसभा पोटनिवडणूक लागली होती, आणि नारायण राणे सेनेच्या विरोधात उमेदवार होते .त्यावेळी या सर्व नेत्यांची जिल्ह्यात यायला थरकाप व्हायची. जिल्ह्यात प्रचाराला फिरायला यांना घाम फुटायचा ,प्रेस कॉन्फरन्स सभा या तर दूरवरच्या गोष्टी होत्या. सिंधुदुर्गाचे नाव जरी घेतलं तरी यांची बोबडी वळायची. त्यावेळी राज्यातल्या राज्यात फिरायचे यांचे वांदे होत होते. त्याकाळी शिवसेनेचे खासदार राऊत जेव्हा जिल्ह्यात यायचे त्यावेळी राजापूर येथे गाडी चा भगवा झेंडा काढायचे आणि जिल्ह्यात प्रवेश करायचे हे तेव्हाच्या शिवसैनिकांना विचारले असता ते तेदेखील त्या गोष्टी सांगतील.. पण तेव्हा सेनेच्या प्रचाराला राज ठाकरेच निधड्या छातीने प्रचारात उतरले होते. दौरा केला होता.. आता सर्व सेटिंग करून अयोध्या दौऱ्यावर जाऊन नेते खूप काहीतरी जिंकल्यासारखे बोलत आहेत, मनसेला विरोध कराणारा बृजभुषण खाजदार हा मनसे च्या भैया विरोधी आंदोलनाला मुळे मनसेला विरोध करीत आहे.. मराठी युवकांच्या नौकरी धंद्याकरीता, मराठी माणसाच्या हिता करीता ती आंदोलने केली होती.. त्या मध्ये मनसेचा कोणताही स्वतःचा स्वार्थ नव्हता.. पण आज त्याच बृजभुषण च्या गळ्यात हात सेना नेते घालत आहेत.. ज्याने मराठी माणसाला त्याच शरयु नदीत बुडवुन मारण्याची भाषा मांध्यमा समोर केली होती.. हे खरे मराठी माणसाचे दुर्दैव आहे. राज ठाकरे शस्त्रक्रियेनंतर आपली दौर्या विषयी भुमिका मांडतीलच.. त्या मुळे स्वतःला असली हिंदुत्ववादी म्हणत आहात रामलल्लाचे खरे पाईक आहात तर भोंग्या वर बोला, संभाजीनगर नामकरणावर खरी भुमिका सांगा,रस्त्यावरील नमाजावर बोला.. आहे का हिम्मत??? त्यामुळे हे दौरे वगैरे शिवसेनेचे बेगडी हिंदुत्व आहे या सर्व गोष्टी जनतेने जाणून घ्याव्यात…

प्रतिक्रिया व्यक्त करा