इयत्ता ६ वी ते १२ वी शालेय विद्यार्थ्यांसाठी आता सुवर्णसंधी..
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) या संस्थेने शालेय विद्यार्थ्यांसाठी “Overview of Space Science and Technology” हा *मोफत ऑनलाईन कोर्स* जाहीर केला आहे.
इस्रो ही एक नामांकित वैज्ञानिक संघटना आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातील क्षमतेला संशोधन आणि त्याच्या विकासात इस्रो (ISRO) चे मोठे योगदान आहे. म्हणूनच ISRO ने भारतीय आणि परदेशातील शालेय विद्यार्थ्यांसाठी अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या समृद्धीसाठी हा कोर्स जाहीर केला आहे.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी जागरुकता निर्माण करणे हा या कोर्सचा मुख्य उद्देश आहे.
हा कोर्स इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तसेच कोर्स ६ जुन ते ५ जुलै या कालावधीत चालेल. नाव नोंदणी अंतिम तारिख ३० जुन २०२२ पर्यंत आहे. या कोर्सविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंक वर दिली आहे.