कवठणी सरपंच यांचे विभाग नियंत्रक यांना निवेदन
सावंतवाडी- सातार्डा- कवठणी- किनळे – वेळवेवाडी एसटी बस फेरी सुरु करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी अशी मागणी कवठणी सरपंच यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे सावंतवाडी विभाग नियंत्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना काळात या मार्गावरील एसटी फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दोन फेऱ्या सुरू करण्यात आल्या. तिसरी फेरी सुरू करण्यात न आल्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तिसरी फेरीही सुरु करावी, अशा आशयाचे निवेदन कवठणी सरपंच यांनी दिले आहे.