सिंधुदुर्गनगरी :
वेंगुर्ला तालुक्यात मौजे तुळस लिंगवाडा येथील घर क्र. 725 घरासभोवतलचा वर्तळाकार 25 मीटर परिसर, मौजे गोडावणे येथील घर क्र. 500 घरासभोवतलचा वर्तळाकार 25 मीटर परिसर, व लाडू गावडे यांच्या घरापासून गुरुप्रसाद वारंग यांच्या घरापर्यंत वर्तुळाकार 50 मीटर परिसर बफर झोन दिनांक 11 ऑक्टोबर 2020पर्यंत, मौजे शिरोडा मोरजकरवाडी येथील घर क्र. 3/36 घरासभोवतलचा वर्तळाकार 25 मीटर परिसर दिनांक 12 ऑक्टोबर 2020पर्यंत, मौजे शिरोडा देऊळवाडी येथील घर क्र. 10 घरासभोवतलचा वर्तळाकार 25 मीटर परिसर दिनांक 13 ऑक्टोबर 2020पर्यंत, कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोन संबंधित दिनांकापर्यंत रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश सावंतवाडी उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत.