जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांची अप्रतिम काव्यरचना
पूजा करा झाडांची वाढवा लाडे लाडे
फक्त वडच नको वाढवा सर्व झाडे
प्रत्येकच झाड म्हणजे आहे पहा औषध
अहो झाडांपासूनच मिळतो पहा मध….
फुले फुलपांखरे वैभव आहे झाडांचे
अनन्यसाधारण महत्व आहे पहा वडाचे
पाना पासून मुळापर्यंत आहे गुणकारी
गर्द सावली वड बाबा डोक्यावरती धरी…
ॲाक्सिजन तर देतातच झाडे देतात फुले फळे
हिरव्यागार वनराईने शांती किती मिळे
घराघरातून झाडे पाठराखण करतात
झोका बांधा झाडाला बाळे त्यात झुलतात …
पशुपक्षी साऱ्यांचेच आहे आश्रय स्थान
झाडे तोडू नका ठेवा पर्यावरणाचे भान
मुळे पाणी मातीला घट्ट धरून ठेवतात
मुक्त वातावरणात झाडे मस्त वाढतात….
झाडे आहेत शान पहा चराचर सृष्टीचे
मुख्य कारणही आहेत जोरदार वृष्टीचे
झाडे असतील तिथे पाऊस आनंदाने बरसतो
हिरवाई पाहून जणू मनोमनी हरखतो….
झाडे म्हणजे प्राण चराचर सृष्टीचे
ते असतील तर जगू भान ठेवा गोष्टीचे
वडाची झाडे तर साऱ्यांचेच आजोबा
झाडांनीच वाढवली ना सृष्टीची ही शोभा …!
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १४ जून वट सावित्री पौर्णिमा
वेळ : ९ : २० सकाळी