पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचा श्री क्षेत्र देहु येथील जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबा महाराज शिला मंदीराचा लोकार्पण कार्यक्रम वारकरी संप्रदायातील मंडळींनी सामुदायिक रित्या विठ्ठल मंदिरात पाहीला .
🔸 भाजपा वेंगुर्ले च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन .
🔸ह.भ.प. सावळाराम कुर्ले बुवांचा भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते सत्कार .
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा श्री क्षेत्र देहु येथील जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिला मंदिराचा लोकार्पण कार्यक्रम वेंगुर्ले शहरातील चांदेरकर बुवांच्या विठ्ठल मंदिरात वारकरी संप्रदायातील मंडळीनी सामुदायिक रित्या पाहीला
भाजपा वेंगुर्ले च्या वतीने या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण चांदेरकर बुवांच्या विठ्ठल मंदिरात केले होते . इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला येत असल्याने हा कार्यक्रम *” नमो तुकोबा – नमो विठोबा “* या नावाने राज्यभरात मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे भाजपा च्या प्रदेश नेतृत्वाने ठरविले होते, त्याप्रमाणे वेंगुर्ले मध्ये भाजपा च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भाजपा च्या वतीने प्रदेश का का सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते ह.भ.प.सावळाराम कुर्ले महाराजांचा शाल , श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी मार्गदर्शन करताना ह.भ.प.कुर्ले महाराज म्हणाले की हा क्षण तमाम वारकरी मंडळींचा भाग्याचा दिन आहे . देशाच्या पंतप्रधानांनी वारकरी मंडळींच्या कार्यक्रमाला येऊन वारकरी सांप्रादयाचा सन्मान केला आहे .
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , जिल्हा का.का.सदस्य वसंत तांडेल , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , नगरसेवक प्रशांत आपटे , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ व बिट्टु गावडे , शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर , सागरतीर्थ उपसपंच सुषमा गोडकर , ओंकार चव्हाण , किशोर रेवणकर , गजानन कुबल , दिवाकर कुर्ले , अनिल ठाकुर , संध्या भोगवेकर , दिपाली कुबल , किर्ती कुर्ले , अंकुश वराडकर ,उर्मिला नार्वेकर , चंदना कुर्ले , पांडुरंग मोंडकर , चित्रा केरकर , सुप्रीया बांदेकर , हेमलता खोबरेकर , प्रमिला टांककर , चंद्रभागा मेस्त्री , देवयानी केरकर , अपर्णा सातार्डेकर , आश्विनी गीरप , लक्ष्मी तांडेल , ग्रीष्मा मयेकर , सायली मसुरकर इत्यादी वारकरी संप्रदायातील मंडळी उपस्थित होती .