जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी सचिन मस्कर यांची अप्रतिम काव्यरचना
आताच्या जगात
लव्ह झालंय मॉर्डन
हार्टशी हार्टच होतंय
इंटरनेटने कनेक्शन..
लव्ह लेटरचा प्रकार
व्हाट्सएपने संपवला
पोरगी पटली वाटताना
दुसऱ्याने नंबर लावला..
सुंदर मुलीच्या हार्टच
अगोदरच बुकिंग होतंय
ब्रेकअप होऊन लगेच
दुसरं हार्ट कनेक्ट करतंय..
मॉडर्न लव्हची गॅरंटी
कधीच देता येत नाही
लग्नानंतरही शंभर टक्के
पार्टनर मानता येत नाही..
©️®️ सचिन मस्कर , नवी मुंबई