You are currently viewing सडूरे- शिराळे नवीन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांच्या हस्ते

सडूरे- शिराळे नवीन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांच्या हस्ते

सडूरे- शिराळे ग्रामपंचायत ची इमारत पूर्णपणे नादुरुस्त झाली होती. येथे लवकरात लवकर नवीन इमारत व्हावी अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच अंकिता रावराणे, उपसरपंच संतोष पाटील आणि या मतदारसंघाचे पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्याकडे मागणी केली होती.

या मागणीचा विचार करून मंगेश लोके यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दीपकभाई केसरकर व खासदार विनायक राऊत साहेब यांच्याकडे या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती. व सातत्याने पाठपुरावा करून ह्या ग्रामपंचायत इमारतीसाठी सन २०१९ – २०२० मध्ये जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा योजनेमधून सडुरे – शिराळे ग्रामपंचायतला निधी उपलब्ध करून घेतला होता. त्यानंतर यावर्षी इमारतीचे काम पूर्ण झाले. यानिमित्ताने गणेशपूजन करून या नवीन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ठेकेदार रामचंद्र बावदाणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सडुरे गावचे माजी सरपंच विजय रावराणे, उपसरपंच संतोष पाटील, ग्रामपंचायत सदस्य आकांक्षा जंगम, लक्ष्मी बोडेकर, कल्पना पाटील, नवलराज काळे, सुनिता धामणे, पूनम रामाने, ग्रामसेवक प्रशांत जाधव, ग्रामपंचायत शिपाई सुनील राऊत, डाटा ऑपरेटर रूपाली रावराणे, अशोक पाटील, शासकीय ठेकेदार रामचंद्र बावदाणे, रमेश शेळके, जेष्ठ ग्रामस्थ संभाजी रावराणे, बिरु बोडेकर, विजय बोडेकर, आत्माराम बोडेकर, संतोष बोडेकर, सुभाष राणे, शाखाप्रमुख संतोष भोसले, दशरथ पडवळ, पोलीसपाटील प्रकाश रावराणे, दीपक चव्हाण, हरिश्चंद्र माने, स्वाती मेजारी, सागर मेजारी, तलाठी अक्षय लोणकर, कृषी सहायक विश्वजीत पाटील आदी ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा