प्रभाग तीनमधील अ जागा अनुसूचित जातीसाठी राखीव…
मालवण
येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठीची आरक्षण सोडत आज प्रांत वंदना खरमाळे, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. यात प्रभाग क्रमांक तीन मधील पहिली जागा अनुसूचित जातीसाठी (महिला किंवा पुरुष) राखीव ठेवण्यात आली आहे.
येथील पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात सोडत कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रांत वंदना खरमाळे, मुख्याधिकारी संतोष जिरगे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, मंदार केणी, महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर, अमेय देसाई, पंकज देसाई, पूजा करलकर, सन्मेष परब, मंदार ओरसकर, मनोज मोंडकर, बाबी जोगी आदी उपस्थित होते.
सुरवातीस प्रभाग क्रमांक तीन मधील अ जागा अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. असे प्रांत वंदना खरमाळे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर प्रभागातील अ व ब जागेच्या आरक्षणासाठी वेदिका सुभाष कुमठेकर हिच्या हस्ते महिला राखीव पदाची सोडत काढण्यात आली. त्यात प्रभागातील सर्व ब जागा महिलांसाठी राखीव म्हणून जाहीर करण्यात आल्या.
जाहीर करण्यात आलेले आरक्षण असे- प्रभाग १ अ सर्वसाधारण, १ ब सर्वसाधारण महिला, प्रभाग २ अ सर्वसाधारण, २ ब सर्वसाधारण महिला, प्रभाग ३ अ अनुसूचित जाती, (महिला किंवा पुरुष), ३ ब सर्वसाधारण महिला, प्रभाग ४ अ सर्वसाधारण, ४ ब सर्वसाधारण महिला, प्रभाग ५ अ सर्वसाधारण, ५ ब सर्वसाधारण महिला, प्रभाग ६ अ सर्वसाधारण, ६ ब सर्वसाधारण महिला, प्रभाग ७ अ सर्वसाधारण, ७ ब सर्वसाधारण महिला, प्रभाग ८ अ सर्वसाधारण, ८ ब सर्वसाधारण महिला, प्रभाग ९ अ सर्वसाधारण, ९ ब सर्वसाधारण महिला, प्रभाग १० अ सर्वसाधारण, १० ब सर्वसाधारण महिला.