You are currently viewing सिंधुदुर्गातील ज्येष्ठांना राष्ट्रवादी कायद्याचे कवच देणार – अमित सामंत

सिंधुदुर्गातील ज्येष्ठांना राष्ट्रवादी कायद्याचे कवच देणार – अमित सामंत

सावंतवाडीत वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान…

सावंतवाडी

जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना आणि विशेषत: महिलांना राष्ट्रवादी कायद्याचे कवच देईल. त्यासाठी आवश्यक असलेला खर्च केला जाईल, उद्या पासून याची अंमलबजावणी करण्यात येईल. प्रत्येक तालुक्यात केंद्र उभारून ही सेवा दिली जाणार आहे, अशी घोषणा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज येथे केली.राष्ट्रवादी पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज सावंतवाडीत तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी पालकमंत्री प्रवीण भोसले, माजी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ रेवती राणे, भास्कर परब, तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, जेष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष अण्णा देसाई, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष नझीर शेख, अफरोज राजगुरू,सावली पाटकर, बी एन तेली, सौ चित्रा देसाई बाबर, हिदायतुल्ला खान, जेष्ठ नागरिक प्रकाश राऊळ, सुधीर घुमे, दत्ताराम सडेकर, अनंत माधव, रामानंद शिरोडकर, रामदास पारकर, डि. के. सावंत, आत्माराम राऊळ आदी उपस्थित होते.

कोकणच्या जडणघडणीत येथील ज्येष्ठ नागरिकांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर अनेक गोष्टी शिकायला मिळतात,असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी सांगितले.

याप्रसंगी उपस्थितांचे स्वागत तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केले. तर प्रास्ताविक सौ. घारे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा