सावंतवाडी :
बांदा येथील पाडलोस येथे पर्यावरणपूरक कापडी बॅग प्रशिक्षण कार्यक्रमाला गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हा कार्यक्रम ग्रामसचिवालय पाडलोस व महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने १५ वा वित्त आयोग अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणात ४० महिलांनी सहभाग घेतला होता. टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेतून कापडी कपड्यांपासून विविध प्रकारच्या पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण महिलांना यावेळी देण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले यावेळी पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोसकर, ग्रामसेवक प्रतिभा आळवे, ग्रामपंचायत सदस्य, बंधू व भगिनी रोनापालचे सरपंच सुरेश गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत माधव, सामाजिक कार्यकर्ते मधुकर परब, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कृष्ण करमळकर, प्रकल्प अधिकारी संजय देसाई, प्रशिक्षक प्रकाश पाटील तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था अध्यक्ष विजयसिंह भोसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रामसेवक प्रतिभा साळवे यांनी केले. तर आभार सरपंच अक्षरा पाडलोसकर यांनी मानले.