जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी रामदास अण्णा यांचा लेख
नमस्कार मित्रांनो, आज एका नवीन आणि आपल्या सर्वांशी निगडित असलेल्या विषयवार मी काही लिहायला पुन्हा एक फक्त प्रयत्न करीत आहे. हल्ली लोकं विचारतात की आपण काय करतो. आणि आपण एका अनिश्चितता असलेल्या ध्येयाच्या मार्गाने प्रवास करणारा पथिक म्हणून सांगतो की मी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. मग ही स्पर्धा आहे का परीक्षा? का एक जीवघेणा खेळ. हो तेच म्हणतोय मी की हा नेमका प्रकार काय आहे. आपण बघतोय की नुकतीच २०२१ ची राज्य सेवा आयोगाचा(MPSC) निकाल जाहीर झाला. त्यामध्ये जवळपास एका पदासाठी १८ ते २० मुले आहेत. आणि जागा फक्त एकच! इथपर्यंत होती ती परीक्षा! आता ज्या २० मुलांना एका पदासाठी झुंज द्यायची आहे ती आहे स्पर्धा. जर आपण वैकल्पिक बाब लक्षात नाही घेतली तर कोणीतरी एक जण ती स्पर्धा जिंकणार. मग बाकी एकोणीस मुलांचं काय. आता पुढे सुरु होतो तो खडतर प्रवास आणि लोकांना उत्तरे देण्याची जबाबदारी. कोणी ही जबाबदारी पेलून पुढे जातो पण मी
प्रत्येक जण इतका सक्षम तर नाही की या निराशेच्या अंधारातून बाहेर निघेलच म्हणून कारण हा प्रवास तुमच्या ध्येयापर्यंत पोहचल्याशिवय तुम्हाला टोचत राहणार. निरंतर ह्या प्रवासात आपण थकतो तर कधी दुसऱ्या मार्गाचा विचार करतो आणि तो म्हणजे वशिलेबाजी किंवा लग्गा बाजी. पण दुसऱ्या प्रयत्नाचे परिणाम म्हणजे आत्महत्या करणे होय. कारण येथून तुमची मानसिकता बदलून जाते. जो थकतो तो विश्रांती घेऊन पुन्हा पुढे चालतो पण जो वाममार्गाला लागतो तो शेवटी संपतो. त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे की आपण परीक्षेत पर्याय शोधण्यापेक्षा जीवनात पर्याय शोधायला हवे. कारण आपण आहे तर पुन्हा परिस्थितीशी दोन हात करू शकतो आणि समाधानी जगू शकतो. म्हणून जीवनात पर्याय उपलब्ध असतात त्यामुळे हताशपणे बसून किंवा जीवन समाप्त करून चालणार नाही. म्हणून महत्त्वाचे आहे की निकाल म्हणजे एक संधी असते आयुष्य नाही. कारण,आयुष्यात संध्या खूप येतात म्हणून प्रयत्नांच्या वाटेवर यश नावाचे एकतरी गाव असते. कधी मार्गावर तर कधी मार्ग बद्दलल्यावर।।
रामदास आण्णा
7987786373