You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथील सेंड्रा फर्नांडिस हीला कर्नाटक राज्यातील धारवाड युनिव्हर्सिटी मध्ये सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल भाजपा अल्पसंख्याक आघाडी च्या वतीने सत्कार

वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथील सेंड्रा फर्नांडिस हीला कर्नाटक राज्यातील धारवाड युनिव्हर्सिटी मध्ये सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल भाजपा अल्पसंख्याक आघाडी च्या वतीने सत्कार

वेंगुर्ले

फाॅरेन्सिक सायन्स लॅब क्रीमीनाॅलाॅजी धारवाड युनिव्हर्सिटी मध्ये वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा गावची रहिवासी कु. सॅड्रा सिलेस्टीन फर्नांडिस ही सुवर्ण पदक घेऊन उत्तीर्ण झाली , तसेच कर्नाटक राज्यात यश मिळवणारी महाराष्ट्रातील ही पहिली विद्यार्थीनी असल्याने महाराष्ट्र राज्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तसेच वेंगुर्ले तालुक्याचे नाव रोशन केल्याबद्दल उभादांडा – सागरेश्वरवाडी येथील घरी जाऊन भाजपा अल्पसंख्याक आघाडी च्या वतीने शाल , भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
फाॅरेन्सिक सायन्स अँड क्रीमीनाॅलाॅजी हा विषय खुप चॅलेंजींग विषय म्हणून ओळखला जातो . यात गुन्हे विषयक सखोल अभ्यास असतो . अशा या आव्हानात्मक विषयात विशेष प्राविण्य मिळवीत सुवर्णपदक मिळवून उभादांडा वासीय॔ची मान गर्वाने ताठ झाली आहे , असे प्रतिपादन सत्कार प्रसंगी भाजपा तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस यांनी केले . व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
यावेळी अल्पसंख्याक आघाडी चे सायमन फर्नांडिस , भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , जिल्हा का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत तांडेल , तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , परबवाडा मा.उपसरपंच संतोष सावंत , सिलेस्टीन फर्नांडिस इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा