कुडाळ :
नादियाड – गुजरात येथे झालेल्या ज्युनियर फेड्रेशन कंरडक ॲथलेटीक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या ॲथलेटीसनी दोन सुवर्ण व चार कांस्यपदक पटकावली यात कुडाळ तालुक्यातील भडगाव खुर्द गावची सुकन्या पूर्वा हितेश सावंत येथे ही सुवर्णपदकाची मानकरी ठरली. तिने तिहेरी उडी प्रकारात सुवर्णपदक प्राप्त केले. सध्या कुटुंबीयांसमवेत घाटकोपर मुंबई येथे राहते. हितेश सांवत हे मूळ कुडाळ तालुक्यातील भडगाव खुर्द – मधलीवाडी येथील रहिवासी आहेत. नोकरीनिमित्त ते मुंबई येथे राहतात. पूर्वाला लहानपणापासून खेळाची आवड आहे. या यशाबद्दल तिचे कौतुक करण्यात येत आहे. आमदार वैभव नाईक यांनी तिचे अभिनंदन केले आहे. पूर्वा हिने मुलींच्या तिहेरी उडीत चौथ्या प्रयत्नात १२.६५ मी. अंतरावर उडी घेत सुवर्णपदक निश्चित केले. ती बंगळूर येथे अंजू जॉर्ज फाऊंनडेशन मध्ये प्रक्षिक्षण घेत आहे.