फुलांचा हार…
ती सुंदर, सोज्वळ,,,
मोगऱ्याच्या कळी सारखी…
सुगंध माळलेली,,,
मी मात्र,,,
तगरीच्या फुलासारखा,,
पांढरा शुभ्र….सुगंधाचा शोधात,,
सांज होताच वाळलेला….
ती मोहक, नखरेल..
चाफेकळी सारखी..
जर्द पिवळा…केशरी
वस्त्र लेऊनी सुगंधीत झालेली.
मी मात्र,,,
जास्वंदीच्या फुलासारखा..
पिवळा, झुपकेदार,,,
रूप अन गंध नसलेला…
ती नाजूक, लयबद्द,,,
जाई-जुई सारखी…
सडपातळ बांधा असलेली,,,
मी मात्र,,,
लाजरीच्या फुलांसारखा..
गुलसर…गोलमटोल,,,
काट्यांच्या मध्ये अडकलेला…
ती रूपवान, भरगच्च,,,
शेवंतीच्या फुलांसारखी…
विविधरंगांनी न्हालेली..
मी मात्र,,,
हारातील दिंड्यासारखा,,,
रूप, गुण नसताही तिच्यासोबत,
देवाच्या गळ्यात शोभणारा…
(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६