You are currently viewing कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. _ श्री. पवन मोरे

कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. _ श्री. पवन मोरे

पुष्पगुच्छ, हार व फुले न देता अनोख्या पद्धतीने केला विद्यार्थ्यांचा सत्कार…

दुर्दम्य इच्छाशक्ती असूनही परिस्थिती आणि साधनांअभावी कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. पवन मोरे यांनी केले.

बारावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केल्याबद्दल हणमंत वडीये येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या प्रांगणात, ‘येरळामाई जनसहयोग फाउंडेशन, हणमंत वडिये’ या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

सत्कार समारंभासाठी वापरात येणारे पुष्पगुच्छ, हार व फुले या पारंपरिक वस्तूंना फाटा देत विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या वस्तू वही व पेन यांचा प्रत्येकी एक संच विद्यार्थ्यांना भेट देऊन व एक फुल झाड देऊन अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणगौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष, शेतकरी संघटनेचे नेते अॅड श्री. सुभाष (बापू) मोरे यांनी इयत्ता बारावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या आयूष्याला कलाटणी देणारं वर्ष असते. इथून पुढे तुमच्या जीवनाचा खरा प्रवास सुरू होतो आहे, तेव्हा अभ्यासपूर्ण व आत्मविश्वासाने वाटचाल करत रहा, आम्हाला तुमच्या कार्याचा गुणगौरव करायला सदैव आवडेल, अशा भावना व्यक्त केल्या.

मार्गदर्शक सौ. अनुराधा मोरे (माई) यांनी पुष्पगुच्छ, हार व फुले न देता अशाही पद्धतीने विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाऊ शकतो, याचा परिपाठ ‘येरळामाई जनसहयोग फाउंडेशन, हणमंत वडीये’ संस्थेने लोकांना घालून दिला आहे, असे म्हणत संस्थेच्या संचालक मंडळाचे कौतुक केले.

गावातील प्रगतीशील शेतकरी श्री. संजय मोरे यांनी शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून न राहता गावातून बाहेर पडा व संधीच्या वेगवेगळ्या वाटा चोखाळा व आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतःचा पर्यायाने गावचा नावलौकिक वाढवा, असा मोलाचा सल्ला दिला. तसेच त्यांनी उसाच्या शेतीचा दाखला देत, त्यामागचे कष्ट, मेहनत, परिश्रम या मागचा अनुभव सर्वांपुढे मांडत गावाबाहेर पडून स्वतःच्या प्रगती बरोबर गावच्या प्रगतीवरही लक्ष देण्यास सांगितले.
पोलिस उपनिरीक्षक श्री. पवन मोरे साहेब यांनी स्व अनुभवांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी व त्यांच्या आई-वडिलांशी संवाद साधला.
मराठी शाळेचे उपक्रमशील शिक्षक प्रदीप जाधव सर यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांनी कार्यक्रमाचे शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रमासाठी बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, तसेच संस्थेचे खजिनदार प्रदीप मस्के, गावच्या सरपंच सौ. मीनाताई गुरव, उपसरपंच श्री. विक्रम मोरे , श्री. संजय मोरे, श्री. जयराम मोरे, श्री. इंद्रजीत मोरे , श्री. महादेव मोरे, श्री. भगवान मोरे तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

बारावी विद्यार्थी सत्कार समारंभ

येरळामाई जनसहयोग फाऊंडेशन तसेच क्रांतिसिंह विश्वस्त मंडळ आणि ग्रामपंचायत हणमंतवडिये यांच्यातर्फे बारावी विद्यार्थी सत्कार समारंभ साजरा करण्यात आला…
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून पवन मोरे सर यांनी आपली कामगिरी बजावली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. वकील बापू, सरपंच मीनाताई गुरव, आजी माजी सरपंच,उपसरपंच मंडळी संजय मोरे सर, विक्रम मोरे साहेब प्रतिष्ठित व्यक्तीमत्व जयराम बापू, भैयासाहेब,महादेव मोरे प्रतिष्ठित महिला व्यक्तिमत्त्व अनुराधा मोरे ( माई ), तसेच इतर उपस्थित मान्यवर मंडळी यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
दरवर्षी प्रमाणे नाव लौकीक मिळवणारे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे स्वागत, मान सन्मान करणारे सुभाष बापू यांनीही उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पास नापास असा भेदभाव न करता त्यांनी प्रत्येकाला आहे त्या परिस्थितीत सर्वांनाच धीर दिला. आपल्या गावचे माजी सरपंच संजय मोरे सर यांनीही मुलांना मार्गदर्शन करताना, आपापल्या पालकांची कुवत,परिस्थिती पाहून प्रत्येक पाल्याला या वाहत्या ज्ञानाच्या गंगेत प्रवाहा बरोबर जाण्याचा अनमोल सल्ला दिला तसेच बोलताना त्यांनी उसाच्या शेतीचा दाखला देत, त्यामागचे कष्ट, मेहनत,परिश्रम यामागचा अनुभव सर्वांपुढे मांडत गावाबाहेर पडून स्वतःच्या प्रगती बरोबर गावच्या प्रगतीवरही लक्ष देण्यास सांगितले. गावचे प्रतिष्ठीत व्यक्तिमत्त्व जयराम मोरे ( बापू) यांनीही उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करताना प्रवाहात मागे पडलेल्या सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे आश्वासन दिले, आरशाची एक बाजू आपण नेहमी पाहत असलो तरी त्याची दुसरी बाजू तितकीच महत्वाची आहे हे त्यांनी सर्वांना चांगलेच पटवून दिले. महिला प्रतिष्ठीत व्यक्तिमत्त्व आदरणीय अनुराधा मोरे ( माई ) यांचेही सर्वांना नेहमीच मार्गदर्शन लाभते. आजही उत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थिनींचा गौरव करताना माईंनी डोळ्यासमोर पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या काही दाखल्यांच्या अनुभव डोळ्यासमोर मांडला. कधीही कुणाचा मान सन्मान करताना क्षणात लोप पावणाऱ्या वस्तूंचा दिखावा न करता चिरकाळ टीकणाऱ्या वस्तूंचा वापर करण्याचा बहुमोल सल्ला माईंनी सर्वांना दिला. आजच्या सत्काराच एक फुलझाड पुढे दहा जणांच्या आयुष्यात सत्कार्याच काम करणार आहे, हेही माईंनी सर्वांना चांगलेच पटवून दिले.
शेवटी आमच्या ज्ञानगंगेचे वाहक, मराठी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अप्पासाहेब जाधव सर यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून, सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचा समारोप केला…..

प्रतिक्रिया व्यक्त करा