जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरविंद ढवळीकर यांची अप्रतिम काव्यरचना
शब्दाविण असशी जे बोलत
दूर दूर तू सखया तेथे
या लटांचे अबॊल नाते
शब्द शब्द मज हळूच सांगते
वाटे मज माहेर किनारा
पाण्या तुन मी वाट चालते
स्पर्शातुन नकळत हृदयाला
थेंब थेंब ते रोज भिजवते
सांगशील का तूच सागरा
प्रिया अधिर ही व्यथा साहते
किरणांशी बिलगून मुग्ध ती
धुंद धुंद मनी स्वप्न पहाते
नको वाटतो प्रिया विसावा
पुनवेची ही रीत सांगते
भाव सागरा भरती येते
शांत शांत जरी वरून भासते
अरविंद