जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी निवृत्त पोलिस अधिकारी वासुदेव खोपडे यांची अप्रतिम काव्यरचना
नाही मिरगाच्या सरी
नाही रोहिणीचा थेंब
अरे पावसा पावसा
सुरू झाली तूही बोंब !!
धरा तपली तपली
गेल्या जागोजागी भेगां
कुठी लपला लपला
काळ्या नभातल्या मेघा !!
नाही आला कोकणात
नाही आला वऱ्हाडात
वाट पाहतोय तुही
जीव ओतून डोयात !!
नाही बापूयाचा टाहो
नाही गार गार वारा
नाचे थुईथुई मोर
परी फुलेना पिसारा !!
तुह्या बिना खोळंबली
आता पेरणी भाताची
झाली व्याकुळ धरणी
वाट पाहे पावसाची !!
वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक(सेवानिवृत्त)
अकोला 9923488556