You are currently viewing २२ जूनला श्रीधर नाईक उद्यानाचे लोकार्पण

२२ जूनला श्रीधर नाईक उद्यानाचे लोकार्पण

कणकवली :

 

महामार्ग चौपदरीकरण कामात बाधित झाल्यामुळे गेली दोन वर्षे बंद राहिल्यानंतर पुन्हा एकदा सुशोभीकरण, सुसज्ज करण्यात आलेल्या कणकवली येथील श्रीधर नाईक उद्यानाचे लोकार्पण श्रीधर नाईक स्मृतीदिनी बुधवार २२ जूनला सकाळी ११ वाजता करण्यात येणार असल्याची माहिती कणकवली ते नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली आहे.

चौपदरीकरनात बाधित झाल्यानंतर श्रीधर नाईक उद्यानाचे गतवर्षी भूमिपूजन करण्यात आले. उद्यानाचे काम आता पूर्ण होत आले आहे. उद्यानाच्या सुशोभीकरणाकरिता जिल्हा नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्या माध्यमातून उद्यान सुसज्ज करण्यात आले आहे. महामार्गालगत असल्यामुळे या उद्यानात यापूर्वी कायमच गर्दी असायची.

त्यामुळेच उद्यानाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात आले. लोकार्पण सोहळ्यास केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, नितेश राणे, वैभव नाईक, दीपक केसरकर व जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधींना देखील निमंत्रित करण्यात येणार आहे.

शहरातील महत्त्वाचे उद्यान असल्याने हा कार्यक्रम भव्यदिव्य करणार असल्याचे नलावडे, हर्णे म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा