सावंतवाडी येथील प्रथितयश वकील तथा माजी नगरसेवक आरोग्य सभापती परीमल नाईक यांचा आज वाढदिवस. सावंतवाडी नगरपालिकेत गेली काही वर्षे एक हुशार आणि अभ्यासू नगरसेवक, उच्चविद्याविभूषित वकील अशी परिमल नाईक यांची ओळख आहे. आरोग्य सभापती म्हणून परिमल नाईक यांनी अतिशय उत्कृष्ट कार्य करत आपल्यात असलेला वेगळेपणा शहरवासीयांना दाखवून दिला होता. कोरोनाच्या काळात शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी त्यांनी विशेष कार्य करत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली होती.
सावंतवाडी नगरपालिकेकडून इंदोर दौऱ्यावर गेलेल्या नगरसेवकांच्या टीमचे नेतृत्व परिमल नाईक यांनीच केले होते. तिथे पाहिलेली स्वच्छता साफसफाई त्यांना “माझी वसुंधरा” अभियानाच्या वेळी नक्कीच कामी आली, आणि माजी नगरसेवक परीमल नाईक आरोग्य सभापती असतानाच राबविलेल्या माझी वसुंधरा अभियानात सावंतवाडी नगरपालिकेला कोकण विभागात अव्वल क्रमांक मिळाला आहे. यामागे परीमल नाईक यांचे पालिकेचे कर्मचारी व अधिकारी यांच्या बरोबरच महत्त्वाचे योगदान आहे. राजकारणात प्रवेश करण्याच्या अगोदर परीमल नाईक एक प्रतिथयश वकील म्हणून ओळखले जात होते. वकिली करत असतानाच त्यांनी न्यायाधीश म्हणून परीक्षा देत यश संपादन करून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदापर्यंत मजल मारली. काही कारणास्तव न्यायाधीश म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली नसली तरी जिल्हा सरकारी वकील जिल्हा सरकारी अभियोक्ता म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. आयुष्यात अशी यशाची शिखरे पादाक्रांत करत त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटविला.
आपला वकिली व्यवसाय सांभाळत राजकारण आणि समाजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ऑल राऊंडर, हरहुन्नरी माजी नगरसेवक तथा आरोग्य सभापती वकील श्री परीमल नाईक यांचा आज वाढदिवस. संवाद मीडियाकडून वकील परीमल नाईक यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा💐💐💐💐💐