दोडामार्ग
ज़िद्द , चिकाटी हे गुण अंगी गुण असले की कठिणातल्या कठीण गोष्टींवरही सहज मात करता येऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण भेडशी येथील यश काणेकर याचे देता येईल . जन्मतःच दिव्यगत्वावर मात करून आताच जाहीर झालेल्या बारावीमध्ये ५९ टक्के गुणे मिळविले. हे गुण निश्चितच इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहेत . खऱ्या अर्थाने सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे ‘ यश ‘ मिळवून इतरांसमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे . भेडशी खालचा बाजार येथील जन्मतःच कर्णबधीर असलेल्या यशने आपल्या दिव्यांगावर मात करत सर्वसाधारण मुलांच्या शाळेत बालवाडीपासून ते बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले. यश याने प्राथमिक शिक्षण जि . प . प्राथमिक शाळा भेडशी खालचा बाजार तर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल भेडशी व त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय भेडशी पूर्ण झाले . हे यश मिळविण्यासाठी त्याला आई – वडील तसेच न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय भेडशीचे प्राचार्य, शिक्षक, वर्गमित्र यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले .