You are currently viewing देवदत्त

देवदत्त

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ जयश्री जिवाजी कुलकर्णी यांची अप्रतिम काव्यरचना

मनातले मालिन्य धुवाया कधी जरासे घर सोडावे
सृष्टीच्या निर्लेप करांनी आयुष्याला सजवून घ्यावे

ईश्वरनिर्मित आहे सृष्टी
अणूरेणू वर दिसते तृप्ती
मंगल पावन प्रसन्नतेला मनावरी या माखून घ्यावे
कधी जरा से घर सोडावे

उणेच नसते जिथे कशाचे
मळभ संपते तिथे मनाचे
मुक्त मोकळे झाल्यावरती चांदणं गाणे ओठा द्यावे
कधीच जरासे घर सोडावे

शीळ घुमवितो अल्लड वारा
नितळ देखणा नदी किनारा
ओघळलेल्या सौंदर्याला तना मनाने पिऊन घ्यावे
कधी जरा से घर सोडावे

आकाशाच्या घुमटाखाली
या धरणीच्या रंग महाली
निराकार त्या परमात्म्याशी संवादाविण बोलून घ्यावे
कधी जरा से घर सोडावे

जयश्री जिवाजी कुलकर्णी
नाशिक फोन नंबर 98 90 25 89 77

प्रतिक्रिया व्यक्त करा