जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ आदिती मसुरकर यांची अप्रतिम काव्यरचना
मराठी शाळांमध्ये
काय आहे कमी
दर्जेदार शिक्षणाची
इथेच मिळते हमी
सर्व योजनांनी युक्त
आमच्या मराठी शाळा
हसत खेळत शिक्षण देऊन
लावतात लळा बाळा
तंत्रस्नेही उपक्रमशील
मराठी शाळेतील शिक्षक
भावी पिढी मजबूत घडवून
ठरतात देशाचे खरे रक्षक
स्पर्धा उपक्रमातून शाळा
सुप्त गुणांचा घेते ठाव
कला-क्रीडा महोत्सवातून
सर्वांगीण विकासास मिळतो वाव
शाळापूर्व तयारी चे मेळावे
मराठी शाळेतच भरतात
शिक्षकांच्या कल्पकतेने
विद्यार्थी शाळेत रमतात
मराठी शाळेतील शिक्षक
हरहुन्नरी कलाकार
दर्जेदार शिक्षण देऊन
मुलांना देतात आकार
मराठी शाळेतच होतो
मुलांचा पक्का पाया
खाजगी शाळेत प्रवेश घेऊन
नका घालवू पैसा वाया
*✒️©सौ आदिती मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*