You are currently viewing अर्ध्या हळकुंडाने पिवळ

अर्ध्या हळकुंडाने पिवळ

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख

थोडक्या आमिषाने हुरळून जाण . आणि आपला स्वाभिमान. आत्मसन्मान. विकणे याला अर्ध्या हळकुंडाने पिवळ म्हणलं जातं
मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. समुहाने रहाणे . एकामेकांच्या सर्व सुखात दुःखात सहभागी होणे हा माणसाचा महत्वाचे गुण आहेत . या उक्तीनुसार दैनंदिन व्यवहारात समाज हा शब्द धर्म, जात, वंश, वर्ग, लिंग आदी भेदांतील स्त्री-पुरूषांचा जनसमुदाय या अर्थी वापरला जातो. अर्थात तो अगदी सैलपणे, ढोबळ व प्रसंगानुरूप बदलणाऱ्या संकुचित व मर्यादित अर्थाने वापरला  जातो. उदा., ‘भारतीय समाज’, ‘आर्य समाज’, ‘हिंदू समाज’ इत्यादी. प्रत्येक  ठिकाणी समाज या शब्दापूर्वी उपसर्ग लावलेल्या विशेषनामानुसार या शब्दाचा अर्थ अभिप्रेत असतो. तो समान असत नाही. देशवाचक, समूह-वाचक, धर्मवाचक वगैरे भिन्न अर्थाने हा शब्द व्यावहारिक भाषेत वापरला जातो; पण या सर्वांहून निराळा असा समाजशास्त्रीय अर्थ या संकल्पनेमागे आहे. त्या दृष्टीने समाज हा एक सहनशील ( सातत्यशील ) व सहकारी   सामाजिक समूह असून, त्यातील सभासदांनी एकमेकांतील आंतर-कियेव्दारे आप्तसंबंधविषयक संघटित आकृतिबंध ( संरचना ) विकसित  केला आहे. एक सामाजिक व्यवस्था या अर्थाने समाज ही संकल्पना समाजशास्त्रात वापरली जाते. समाज म्हणजे परस्परांशी आंतरकिया कर-णाऱ्या व्यक्ती आणि समूहांची मिळून बनलेली एक व्यापक संघटना-व्यवस्था होय. सामाजिक आंतरकियेमुळेच व्यक्ती आणि समूहात निश्र्चित स्वरूपाचे सामाजिक  संबंध  निर्माण  झालेले  असतात.
केवळ लोकांचा समूह म्हणजे समाज नव्हे. व्यक्तीहून निराळे असे स्वतंत्र अस्तित्व समाजाला असते. व्यक्ति-व्यक्तींत, व्यक्ति-समूहांत आणि समूह-समूहांत स्थिर स्वरूपी सामाजिक संबंध निर्माण होऊन त्याची एक व्यवस्था अस्तित्वात आल्यानंतरच त्याला समाज म्हटले जाते. समाजाला स्वत:ची अशी संरचना असते. त्याला सातत्य असते. भौतिक वस्तूंमधील संबंधांहून सामाजिक संबंध अगदी निराळे असतात. भौतिक वस्तू एकमेकांजवळ असल्या, तरी त्यांना परस्परांची जाणीव नसते; पण दोन मानवी व्यक्ती एकत्र आल्या की, त्या एकमेकांच्या धार्मिक विधीने एकत्र येतात
भारतीय संस्कृती सर्वात श्रेष्ठ आणि आपला भारत हा सर्व जाती धर्माच्या लोकांच्या साठीच आहे. पूर्वी लोकांचे आपापल्या जगण्याच्या दृष्टीने व आपल्या कलेनूसार व्यवसाय करत होते. जसं गवंडी. सुतार. लोहार. कातकरी. रखवालदार. शेती. खाटीक. असे एक नाही अनेक व्यवसाय होतें. आणि असे व्यवसाय पिढीजात लोक करायला लागले . आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यानुसार लोकांच्या जाती सुध्दा निश्चित झाल्या म्हणजे लोकांच्या व्यवसायावरून जातं निर्माण झाली .हे खर आहे. प्रत्येकाचा समाज वेगळा आणि प्रत्येकाने आपला वेगळा सुभा घेतला आणि आपल्या समाजासाठी लोकांनी आपल्या समाजातून आपला हक्काचा प्रतिनिधी निवडला आणि मग चालू झालं जातीच राजकारण मग सर्वांनी आपल्या आपल्या सवडीनूसार अनुसूचित जाती जमाती. भटक्या विमुक्त जाती. इतर मागासवर्गीय. अल्पसंख्याक. बहुसंख्यांक. सबल. दुर्बल. अशी वर्गवारी करुन जातीला एक वेगळ वळण दिले.
राजकारणी लोकांनी याच समाजातून अध्यक्ष उपाध्यक्ष.अशी पक्षाचे काम करणारी तरुण मुल घेऊन पहिल्यांदा समाज पोकळ केला . यामुळे त्याच समाजातील व्यक्ती एखाद्या पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणजे समाजातील सर्वजण त्यांच्या सोबत माकडासारखे नाचायला लागलें. राजकारणी आणि शासनाने मिळून समाजातील लोकांची मोठी फसवणूक केली ती म्हणजे प्रत्येक समाजासाठी एक आर्थिक विकास महामंडळ याच बुजगावणे उभ केल. आणि मराठी समाजासाठी आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ. मुस्लिम समाजासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळ. महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ. बाबासाहेब आंबेडकर आर्थिक विकास महामंडळ. ठक्कर बाप्पा आर्थिक विकास महामंडळ. विविध घरकुल विकास महामंडळ. अशी एक नाही अनेक बुजगावणे उभं केली त्याचा लाभ गोरगरीब लोकांना सर्वसामान्य जनतेला झालाच नाही. त्याचा लाभ राजकारणी व त्यांचे बगलबच्चे आज या आर्थिक विकास महामंडळावर सापा सारखे बसले आहेत. प्रत्येक समाजासाठी एक आर्थिक विकास महामंडळ आहे म्हणजे प्रत्येक समाजासाठी ठराविक निधी शासन अगोदरच बाजूला काढते.आपण चौकशी करत नाही तिथपर्यंत पोहचत नाही. याच उदाहरण आहे ते म्हणजे मुस्लिम समाजासाठी असणारे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ आमचें मुस्लिम बांधव कधी आपला किंवा समाजांचा विकास करण्यासाठी कधी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडे गेलेच नाहीत. त्यामुळे निधी परत गेला. म़डळाला निधी नाही. कार्यालयात कर्मचारी अधिकारी नाही यामुळे आज मुस्लिम समाजाचे मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ बंद पडण्याच्या मार्गावर आहे. मुस्लिम अल्पसंख्याक नेते कुठ आहेतः. त्यांनी मुस्लिम समाजासाठी काय केले म्हणजे आपल्या ध्यानात आल असेल कि मुस्लिम समाजांचे व इतर समाजांचे एक गठ्ठा मतदान मिळविण्यासाठी सरकारनं प्रत्येक समाजातील एक पुढारी नेता आमदार खासदार मंत्री ही नुसती बुजगावणी ज्यांना कोणताही अधिकारी नाही. आपल मत मांडण्याचा अधिकार नाही अश्या नेत्यांना पदांवर राहण्याची लाज कशी वाटत नाही
समाजातील लोक नेत्यांच्या दारात गरिबा सारखें उभे राहतात आणि काय मागतात
** गावांसाठी स्मशानभूमी बांधा कशासाठी लोकांना लवकरात लवकर जाळण्यासाठी
** गावांसाठी समाजमंदिर बांधा लोकांना झोपण्यासाठी . जुगार दारू अवैध धंदे करण्यासाठी. सभा मिटींगा नावाखाली गावांत जातीयतेढ भांडणं. यासाठी पाहीजे समाजमंदिर
** गावांसाठी समाजासाठी मंगल कार्यालय बांधा मुलांना नोकरी नाही मग मुली कोण देणार लग्न होणारं का कशासाठी पाहिजे मंगल कार्यालय
** समाजातील गावातील पदाधिकारी निवड कशासाठी या पुढारी नेते मंत्री खासदार आमदार यांची हुजूरी करण्यासाठी
अशी एक नाही अनेक बुडबुडाचया मागण्या की ज्याचा उपयोग समाजाला कमी आणि इतरांना जास्त होतो . अश्याच मागण्या केलेल्या आपणांस दिसतात आणि जी आपली गरज नाही ती गोष्ट आपणांस एकादा निवडणूकीचया तोंडावर देतो आणि आपणं अर्ध्या हळकुंडाने पिवळ होतों
प्रत्येक समाजाने काय मागितलं पाहिजे नेत्यांन काय केल पाहिजे. तर प्रत्येक समाजासाठी असणारे आर्थिक विकास महामंडळ यांना भरिव निधी दिला पाहिजे. समाजातील मुलांच्या साठी व्यवसाय कर्ज देण्यासाठी आर्थिक विकास महामंडळाच्या तिजोरी मोकळ्या करा. समाजातील मुलांसाठी कला कौशल्य विकास पोलिस परिक्षा पूर्व प्रशिक्षण वर्ग मोफत चालू करा. समाजातील मुलांसाठी नोकरि भरती. पोलिस भरती . सैनिक भरती साठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ह्या गोष्टी साठी आपल्या समाजातील कोणताच व्यक्ती नेत्यांकडे किंवा आर्थिक विकास मंडळ. अल्पसंख्याक नेते यांचेकडे आपण जातो कां??
निवडणूकीचया तोंडावर एखादा नेता विशिष्ट समाजासाठी मंगल कार्यालय. स्मशानभूमी. समाजमंदिर. संपर्क कार्यालय. समाजातील लोकांच्या भेटीगाठी . घेतात आणि आम्ही आपल्या समाजासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला पण मुलांना रोजगार निर्मिती नाही .मग काय कामांचा तो निधी म्हणजे आपणं गुलाम आहोत गुलामीत जगा गुलामीत मरा
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा