You are currently viewing कुडाळ मध्ये बॅ.नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयात रंगली फ्रेशर्स पार्टी

कुडाळ मध्ये बॅ.नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयात रंगली फ्रेशर्स पार्टी

कुडाळ :

माणसं समजून घ्या. माणसांशी माणसासारखे वागा .त्यांच्या वेदना समजून घ्या. त्या दूर करण्याचा आपल्यापरीने प्रयत्न करा”. असे उद्गार बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी काढले. ते फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या फ्रेशर्स पार्टी मध्ये प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “समाजसेवेचा सुंदर व व्यावहारिक मार्ग आपण निवडलेला आहे. त्याच सोनं करा. आपल्यासाठी जगताना इतरांसाठी जगा व इतरांना जगण्याचा आत्मविश्वास द्या. असे सांगत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे दिमाखात स्वागत करण्याची आपली आदरातिथ्यशीलवृत्ती कौतुकास्पद आहे.असे सांगत नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या.यावेळी व्यासपीठावर फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरज शुक्ला,नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना भंडारी,बॅ नाथ पै महिला महाविद्यालय आणि रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्री अरुण मर्गज, डॉ.प्रगती शेटकर, इ.उपस्थित होते.

 

 

दीप प्रज्वलन करून सुरुवात झालेल्या कार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त करताना अरुण मर्गज यांनी “जीवनात सकारात्मकता महत्त्वाची आहे. ती नातेसंबंध दृढ करते, गैरसमज विसर्जित करून आनंदी जीवन जगण्याचा मूलमंत्र देऊ शकते. याचे भान ठेवून समाज सेवेचे जे सुंदर क्षेत्र डॉक्टरी पेशा मार्फत आपल्या समोर चालून आलेले आहे. त्याचा आनंद घ्या त्याचा समाजासाठी उपयोग करा. जेणेकरून अर्थार्जन करता करता समाज सेवा ही तुम्हाला करता येईल”. असे सांगत या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्वांचे स्वागत केले अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

 

डॉक्टर सुरज शुक्ला यांनी “डॉक्टरी पेशा मध्ये प्रवेश करु इच्छिणाऱ्या सर्वांचे महाविद्यालयातर्फे स्वागत केले. आणि दुर्दम्य इच्छाशक्ती व डॉक्टर बनण्याचा आशावाद ठेवून व परिश्रम करण्याची सवय लावून जर विद्यार्जन केले तर यशस्वीरित्या फिजिओथेरेपी तुम्ही डॉक्टर होऊ शकता. या डॉक्टर की चा उपयोग स्वतःबरोबर इतरांच्या सुख आणि आनंदासाठी करा .असे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या‌.

 

डॉ. प्रगती शेटकर यांनी सुद्धा “सर्व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि फिजिओथेरपी डॉक्टर होणे निरामय जगताची गरज आहे. ती गरज आपण नक्कीच पूर्ण कराल’ यासाठी सूक्ष्म अध्ययन करा, सर्व ज्ञान प्राप्त करा. जेणेकरून तुमच्या ज्ञानाचा उपयोग निरोगी समाज घडविण्यासाठी होऊ शकतो. असे सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नवीन प्रवेशित व अगोदर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी मनोरंजनपर सांस्कृतिक कार्यक्रम , विविध मनोरंजनात्मक खेळ सादर केले वातावरण उत्साही ठेवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृण्मयी खानविलकर, दिशा कांगडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. प्रगती शेटकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा