महाराष्ट्र शासनाचे अधिकृत प्रवेश सुविधा केंद्र कार्यरत
सावंतवाडी
पॉलिटेक्निक अर्थात डिप्लोमा इन इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाची शैक्षणिक वर्ष 2022-23 वर्षाची प्रवेश प्रक्रिया यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक येथे सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाचे अधिकृत प्रवेश प्रक्रिया केंद्र भोसले पॉलिटेक्निकमध्ये सुरू करण्यात आले आहे._
_दहावीच्या निकालापूर्वीच परीक्षेच्या आसन क्रमांकाच्या आधारे विद्यार्थी आपली प्रवेश नोंदणी करू शकतात. ही प्रक्रिया 30 जून पर्यंत चालणार असून इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरिता कॉलेजला प्रत्यक्ष भेट द्यावी असे आवाहन प्राचार्य गजानन भोसले यांनी केले आहे._
_यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक हे संपूर्ण कोकणातील एन.बी.ए. (National Board of Accreditation) मानांकित अभ्यासक्रम उपलब्ध असलेले एकमेव तंत्रनिकेतन आहे. या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व सिव्हील इंजिनीअरिंग हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. कॉलेजचा ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल अतिशय कार्यक्षम असून मागील पाच वर्षात 700 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे नोकरी मिळवून देण्यात यशस्वी झाला आहे._
_कॉलेजमध्ये सर्व प्रकारच्या शासकीय फी सवलती उपलब्ध असून आवश्यक कागदपत्रे व इतर माहितीसाठी कॉलेजचे प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रा.दीपक पाटील 9421718850 किंवा जनसंपर्क अधिकारी नितीन सांडये 9823869128 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे._