जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरविंद ढवळीकर यांची अप्रतिम काव्यरचना
किती पाहिली वाट तुझी तू आला नाहिस
वा रे पाउस !
पाणि आमच्या पळे तोंडचे द्रवला नाहिस
वा रे पाउस !
कुणी मांडले यद्न्य,नवस,तू बधला नाहिस
वा रे पाउस !
गर्जुन कधि दाविशी आंस हि कसली साजिश
वा रे पाउस !
वीज पेटली,कधि मेघ दाटले, तू पटला नाहिस
वा रे पाउस !
पाहून रोष, ऎकून दोष, तुज पडे न तोशिस
वा रे पाउस !
रागाने मग अकांड तांडव हि कसली खुन्नस
वा रे पाउस !
पर्जन्यराज ,जलदॆवत मानुन चुकला माणुस
वा रे पाउस !
कां घरा कडे वळलेले पाउल टिपले नाहिस
वा रे पाउस !
सृष्टिस हवा आधार ना प्रहार तू देव कि राक्षस
वा रे पाउस !
तुज आण विठूची हात कटीवर नकोस मानुस
वा रे पाउस !
भक्तांचा त्राता उभा विटेवर नकोस विसरुस
वा रे पाउस !
ये हांसत, नाचत ,प्रेमे भिजवत म्हणतिल सारे
वा रे पाउस! वा रे पाउस!
अरविंद