पर्यटन व्यवसायात येणाऱ्या अडचणी ऑनलाईन पध्दतीने संकलन
गेल्या वर्षभरात जिल्हय़ातील पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला आहे. डिसेंबर मध्ये वादळ सदृशस्थिति व गेले सहा महिने कोरोनामुळे जिल्हय़ात पर्यटन व्यवसायात असलेल्या होम स्टे, हॉटेल लॉजिग, बोटींग, वाँँटर स्पोर्ट, स्कुबा डायव्हिंग, गाईड, टुरिस्ट व्हेईकल यांची आर्थिक स्थिति दननिय झाली असून या कठीण स्थितिमधून बाहेर पडणार कसे, हा यक्ष प्रश्न या व्यवसायिकांना भेडसावत आहे. सरकारी मदत कींवा कुठलेही अनुदान न घेता आपले व्यवसाय उभे करून जिल्ह्याचे पर्यटन शेत्रात नाव जगाच्या नकाशावर कोरले आहे. पर्यटन व्यवसायिकांना एकत्र करून त्यांच्या प्रलंबित प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही ऑनलाईन माहिती संकलन सुरू आहे.
व्यावसाईकांनी https://forms.gle/FNqeVVc3A8uzzk857 या लिंक वर आपली सर्व माहिती भरायची आहे.
व्यवसायिकांनी घेतलेली बँकेची कर्जे, त्यावरील थकीत हप्ते, वाढलेले व्याज, त्यासाठी बँकेची भरण्यासाठी सक्ती, रिसॉर्ट च्या कामगारांचा पगार प्रश्न, चालवायला ज्याने भाड्याने घेतलेलं हॉटेल त्यांची भाडे-डीपॉजिट समस्या, पर्यटन बंद काळातील वाढीव वीज बिले, सि आर झेड कायद्याच्या अडचणी तसेच शासनाने पर्यटन सुरु केले आहे तरी पर्यटक नाहीत, बंद काळातील नुकसानीची भरपाई अशा व अनेक समस्यांवर सरकारला पर्यटन व्यावसाईकांसोबत येण्यासाठी भाग पाडणेसाठी भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग च्या वतीने प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी ही ऑनलाईन माहिती पूर्ण पणे भरून अर्ज सादर करावा, असे आवाहन जिह्यातील पर्यटन व्यवसायिकांना करीत आहोत अशी माहिती भाजपा जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर यांनी दिली .