*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ यांची अप्रतिम काव्यरचना*
**************
भर गर्दीत प्रवासात
कुठेतरी वर्दळीत
बाळ रडायला लागले की
जवळपासच्यांना
त्याचा त्रास व्हायला
लागतो
बाळाच्या आई कडे
त्रासिकपणे बघत असतो
मग आई कवेत घेवुन
बाळाला शांत करते
मांडीवर झोपवताना
दोनचार शहाण्यांचे
उपदेशही ऐकून घेते
कसेतरी अवघडून
ती बाळाला दुध पाजत
असते
पदर सावरून स्वतःला
झाकून घेत असते
तिरकस तारकस ऐ
बऱ्याच नजरा
तिच्याकडे वळतं असतात
कळत नाही कुठल्या हेतूने
पाहत असतात
प्रत्येकाचे बालपण
असेच गेले असते
असच झाकूनझूकुन
छातीला धरून
आईने दुध पाजले असते
अरे ती आई असते
तिचं बाळ रडल्यावर
आपणच आईबाप
भाऊ होवून तिला
आधार द्यायचा
सन्मानाचा पदर
डोक्यावर टाकायचा
कुठेही गेली तरी तिला अवघडल्यासारखे
वाटायला नको
आपली पाठराखण
असल्यावर एकही नजर
वळायला नको
कारण
मातृत्वाला कुठलीच जात
आणि नातेगोते लागत नाही
आईच्या ममतेत कुठलाच
परकेपणा ऱ्हात नाही.
*संजय धनगव्हाळ*
९४२२८९२६१८