सिंधुदुर्गनगरी :
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपेचात काल आणखी एका मानाच्या पुरस्कार देण्यात आला. देशभरातील १५०० हुन अधिक सहकारी बँकांमधून ग्राहकांची विश्वासार्हता जपत जिल्हा सहकारी बँका गटात सभासद ठेवी गोळा करण्यामध्ये गुणवत्तापूर्वक काम करणाऱ्या बँकेला ‘बँको ब्लु रिबन’ पुरस्कार २०२१ ने सन्मानित करण्यात आले रिझर्व्ह बँकेचे माजी मुख्य व्यवस्थापक श्री डी. जी.काळे सर यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
देशभरातील अग्रगण्य अश्या ९० हुन अधिक सहकारी/अर्बन बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेस लोणावळा येथे बँको पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आला.सदर पुरस्कार जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर,संचालक विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटवणेकर, गणपत देसाई,विद्याधर परब, समिर सावंत, संचालिका श्रीम.प्रद्या ढवण,श्रीम.नीता राणे यांनी स्वीकारला.
अविज पब्लिकेशन , कोल्हापूर या संस्थेमार्फत प्रतिवर्षी सहकार क्षेत्रात देशपातळीवर कार्यरत व उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना दिले जातात. देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या गटातून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला “बँको ब्यू रिबन पुरस्कार २०२१ ” जाहीर करण्यात आला.
गुरूवार दिं.०२जून २०२२रोजी लोणावळा -पूणे येथे शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. देशभरातील अग्रगण्य अश्या ९० हुन अधिक सहकारी/अर्बन बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी पाच सत्रांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला,त्यात त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले.श्री काळे सर यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातुनही बँकेबाबत आस्थेने चौकशी केली तो क्षण मनाला भावणारा आणि आगामी काळात काम करण्यासाठी प्रेरणा देणारा तर होताच पण त्याच जोडीने अधिकच्या जबाबदारीचे भान लक्षात आणून देणारा होता.
जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.जिल्हा बँकेचे सर्व संचालक ,अधिकारी, कर्मचारी,ग्राहकांमुळेच हे यश साध्य झाल्याची केली प्रतिक्रिया त्यांनीयावेळी त्यांनी व्यक्त केली.पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी पाच सत्रांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला,त्यात त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कर्ज प्रणालीत विभिन्नता आहे हा बदल होत जाणार आहे.बँकींग शेत्रात पूर्वी काय घडलय हे विसरून पूढे आर्थिक प्रगतीकडे गेलं पाहीजे.बँक शेत्रातील वाढलेली जोखीम प्रबंधनता स्वीकारली पाहीजे.असं प्रतिपादन रिझर्व बँकेचे माजी सीजीएम डी आर काळे यांनी लोणावळा येथील बँको पुरस्कार वितरण सोहळ्यात केले.