कणकवली :
सर्व जातीय वधुवर सूचक समन्वय समितीच्या नोंदणी कार्यालयाचे उदघाटन मराठा समाजाचे जेष्ट सामाजिक कार्यकर्ते श्री. एस. टी.सावंत यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. यावेळी तेली समाजाचे श्री.नंदकुमार आरोलकर, गाबीत समाजाचे जिल्हा संघटक श्री. चंद्रशेखर उपरकर,शिंपी समाजाचे श्री बापू महाडिक, वाणी समाजाचे श्री. महेश काणेकर, मराठा महासंघाचे सामाजिक कार्यकर्ते श्री.सुशील सावंत,सखाराम सपकाळ,तेली समाज कार्यकर्ते श्री.तात्या कुवळेकर वगैरे सर्व जातीय पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. एस टी.सावंत म्हणाले कि, आपण सर्वच जातींसाठी एकत्र येऊन वधु वरांचे विवाह जुळविणयासाठी प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हे संपर्क कार्यालय सुरु केले आहे.सदरील कार्यालय सुमनराज ट्रेड सेंटर,एस. टी.स्टैण्ड समोर ,सुपर बाजार नजिक कणकवली येथे सुरु करण्यात आले असून येथे दररोज सकाळी 9 ते 1 वाजेपर्यत विवाह नोंदणी करण्यात येईल.
मुलींच्या नोंदणीचे प्रमाण अत्यल्प होत असल्याने जिल्हयातील शिक्षित अथवा अशिक्षित मुलींच्या नोंदणी सुद्धा पालकांनी केल्यास अनेक रखडलेले विवाह जुळणयास मदत होईल असा विश्वास पदाधिकाऱ्यानी व्यक्त केला आहे.तसेच यापुढे प्रत्येक पंचक्रोशी च्या गावात बाजाराचे दिवशी नोंदणी मोहिम उघड़णयाचेही ठरविले आहे त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.