You are currently viewing भारतात डिजीटलायजेशने क्रांती घडवली

भारतात डिजीटलायजेशने क्रांती घडवली

पुणे :

अमेरिका आणि चीन नंतर भारताचा स्टार्ट अपच्य क्षेत्त्रात तिसरा क्रमांक लागत असून हा क्रमांक भारताचे वेगाने होणारे डिजिटलायजेशन अधोरेखित करतो. भविष्यात आत्मनिर्भर भारत आणि डिजिटलायजेशन भारतात क्रांती घडवेल, असा विश्वास ज्येष्ठ उद्योजक भूषण बाबा कल्याणी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला. भूषण फाउंडेशन तर्फे ३२ पुण्यभूषण पुरस्कार शनिवार दिनांक ४ जून २०२२ रोजी ज्येष्ठ पद्मभूषण यांना प्रदान करण्यात येणार आहे यानिमित्त ज्येष्ठ उद्योजक पद्मभूषण बाबा कल्याणी यांच्याशी मुंढवा येथील भारत फोर्ज कंपनी पत्रकार यांचा विशेष संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई उपस्थित होते. पद्मभूषण बाबा कल्याणी म्हणाले, केंद्रीय स्तरावर धोरणांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. स्वच्छ भारत, स्मार्ट सिटी, आत्मनिर्भर भारत या धोरणामुळे नवचैतन्य निर्माण झाले आहेत. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना चालना मिळाली आहे. प्रत्येक विभाग यांनी पुढे येऊन भारताच्या प्रगतीत आपण काय योगदान देऊ शकतो, याचा विचार केला पाहिजे.

प्रतिक्रिया व्यक्त करा