सावंतवाडी
कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा व निरवडे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ८ जून रोजी मिरगवणी आणि मालवणी गजाली असा नाविन्यपूर्ण पावसाळी साहित्य मेळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सायंकाळी सहा ते आठ या वेळात निरवडे ग्रामपंचायत येथे होणार आहे.या मीरगवणी आणि मालवणी गजाली असा हा साहित्य मेळा प्रथमच घेतला जात आहे.
कोकणातील पावसाचा पहिला दिवस मिरग ही संकल्पना आगळीवेगळी आहे. आणि याची महती आणि परंपरा कोकणच्या चालीरिती संस्कृतीला एक वेगळे महत्त्व देणारी आहे. त्यामुळे ह्या मिरग पावसाळी ऋतूतील पहिला दिवस कोकणात कसा साजरा केल्या जातात. आणि त्याची महती कायम टिकावी यासाठी तसेच मालवणी भाषा व संस्कृती टिकण्यासाठी मालवणी बोलीभाषा आता लोक होत चालली आहे. ती कायम टिकावी आणि त्याचे महत्त्व कायम राहावे, या उद्देशाने कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने मी रग आणि मालवणी गजाली यांची एकत्र सांगड घालत येत्या सात जून पासून दरवर्षी मिरग पावसाळा सुरू होतो.्या पार्श्वभूमीवर आठ जूनला साहित्यक्षेत्रातील मिर गवणी व मालवणी गजाली नाविन्यपूर्ण उपक्रम निरवडे गावात घेतला जाणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने गेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एप्रिलमध्ये वर्षभरात विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर पावसाळी ऋतूतील पहिला पावसाळा मिरगा ने सुरु होतो. ते औचित्य साधून मी र ग वणे आणि मालवणी गजाली हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमांमध्ये उपक्रमांमध्ये संपूर्ण मालवणी भाषेतच कार्यक्रम केला जाणार आहे. मालवणी भाषेचे संगोपन व जतन करण्याच्या दृष्टीने कविता गजाली नाटिका गीत याद्वारे मालवणी गजाली चर्चा संमेलन होणार आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष मंगेश मस्के आधी कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी तसेच मालवणी कवी दादा मडकईकर आदि उपस्थित राहणार आहेत. तरी या मालवणी गजाली संमेलनात उपक्रमात ज्यांना मालवणी भाषेत कविता गीत गझली सांगायचे असतील त्यांनी सहभाग घ्यावा, तसेच आपले नावे येत्या पाच जून पूर्वी द्यावीत, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेकडे नोंदवावीत,असे आवाहन अध्यक्ष एड. संतोष सावंत व सरपंच हरी वारंग सचिव प्रतिभा चव्हाण आदींनी केले आहे.