*पणदूर बूथ कमिटी अध्यक्ष दीपक साईल*
कुडाळ :
जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायत पणदुरचे सरपंच तथा भारतीय जनता पार्टीचे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांच्या गेल्या 15 वर्षाच्या कारकीर्दत पणदूर ग्रामपंचायतीचे नाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात गाजवले आहे. दादा साईल हे राज्यातील अधिकारी आणि सरपंचांना ग्रामपंचायत कारभार आणि वित्त आयोगाचे प्रशिक्षण देण्याचं काम देखील आज करत आहेत. अतीशय कमी वयात त्यांच्या कर्तृत्वाची हीच पोच पावती आहे.
सरपंच दादा साईल यांनी केलेले काम आणि गावातील सर्व स्तरातील ग्रामस्थांना बरोबर घेऊन त्यांनी दिवसरात्र घेतलेल्या मेहनती मुळे पणदूर गावाला आज जिल्हा आणि तालुका स्तरावर सर्व पुरस्कार प्राप्त आहेत. त्यामध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वछता अभियान, तंटामुक्त गाव पुरस्कार, निर्मल गाव पुरस्कार, पर्यावरण विकासरत्न पुरस्कार, अस्पृश्यता निर्मूलनात चांगले काम केल्या बद्दल जिल्हा पुरस्कार, पिकप प्लास्टिक डे, पेपरलेस ग्रामपंचायत आणि तालुका आणि “जिल्हा स्मार्ट गाव पुरस्कार” इ. अनेक जिल्हा आणि तालुका स्तरीय पुरस्कार प्राप्त आहेत. पणदूर गावाचा शासनाच्या प्रत्येक अभियानामध्ये आणि योजनामध्ये पुरेपूर सहभाग असतो. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी पणदूर गावाकडे वाकड्या राजकीय नजरेने बघितलं तर खपून घेणार नाही.
गेल्या 15 वर्षात दादा साईल ग्रामपंचायती असल्यापासून त्यानी ग्रामपंचायत कारभारात राजकारण आणले नाही. गावातील सर्व नागरिकांना त्यांनी आपलेपणाने होणारी सर्व मदत केलेली आहे. गावातील सर्व लोकांच्या सुख दुःखात वेळोवेळी धावून जातात. सरपंच दादा साईल यांच्या या कामाची पोचपावती म्हणून गावातील लोकांनी सलग तीन वेळा ग्रामपंचायत वर निवडून दिले आहे.
एवढंच नव्हे आपल्या म्हणण्याप्रमाणे गेली 25 वर्ष ग्रामपंचायत वर सत्ता दादा साईल यांच्या घरात आहे. त्याहूनही जास्त काळ असेल परंतु गावातील नागरिकांनी दादा साईल यांच्या घरावर ठेवलेली ती श्रद्धा आहे. आपल्या म्हणण्याप्रमाणे पणदूर गावात शिवसेनेला मतदान कमी होत त्याच कारण दादा साईल आणि त्याचे कुटुंबिय आहेत.
पणदूर गावचे माजी सरपंच कै.भास्कर साईल हे माझे सख्खे काका असून सरपंच दादा साईल त्यांना राजकीय आदर्श मानतात. माजी सरपंच कै.भास्कर साईल हे राणे साहेबांचे अखेर पर्यंत कट्टर समर्थक म्हणून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात माहिती आहेत. माजी आमदार शंकर भाई कांबळी यांच्या माध्यमातून जो रस्ता केला म्हणतात तो सुध्दा नारायण राणे साहेब मंत्री असताना झालेला आहे. या पणदूर मुख्य रस्त्या तयार करण्याचे काम आणि त्यावर खडीकरण करण्याचे काम हे दादा साईल यांचे वडील चंद्रकांत साईल सरपंच असताना झालेले होते. आणि त्यामुळेच पणदूर गाव आहे हायवेला जोडला गेला. शिवसेनेचे नेते या पणदूर मुख्य रस्त्यावर जो खर्च केला म्हणता ते काम मान.निलेशजी राणे खासदार असताना पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून दादा साईल यांनी केलेल्या पाठपुराव्याने मंजूर झालेले होते. मान.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे. याचे श्रेय आपण घेणे केवळ हास्यास्पद आहे. फक्त आपल्या खासदार/आमदार कारकीर्दीत त्यावर खर्च झाला. ह्यात आपण मोठे पणा वाटून घेऊ नये.
गावातील इतर चार-दोन रस्ते-गटारे इतर किरकोळ कामे ग्रामपंचायत थेट देऊ शकते का?? याची पण शहानिशा करावी. ग्रामपंचायत मागणी करते, सरपंच त्याचा पाठपुरावा करतात. प्रस्ताव दिल्याशिवाय ही कामे होऊ शकली नसती. पणदूर गावातील कोणत्याही कामाची पाहणी आपण जाऊन करावी. त्यात आपल्याला कोणीही अडवलेलं नाही.
या भागातील जिल्हा परिषद सदस्य हे दररोज पणदूर ते कुडाळच्या दिशेने ये-जा करत असतात त्यांना गावातील स्वच्छता विषयक किंवा अन्य कोणत्याही कामात गेल्या 5 वर्षात अडचणी होत्या तर त्यांनी गावातल्या लोकांना बरोबर घेऊन शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांकडून का पाठपुरावा केला नाही?? त्याचे देखील त्यांनी उत्तर द्यावे..
*राहता राहिला प्रश्न स्मार्ट आणि स्वच्छ बक्षीस रकमेचा. 2019-20 साली पणदूर गावाला सिंधुदुर्ग जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून निवडण्यात आलं. त्याच बक्षीस म्हणून 40 लाख रुपये गावाला मिळणार आहेत. परंतु शिवसेनेच्या पालकमंत्री आणि शासनाच्या नाकर्तेपणामुळे ही बक्षिसाची रक्कम गावाला अजूनही प्राप्त झालेली नाही आणि प्रलंबित असलेल्या रक्कम कशी खर्च होऊ शकते याच उत्तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी द्यावे..*