You are currently viewing जिल्हयात “सिंधुदुर्ग कला अकादमी”ची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी प्रयत्न…

जिल्हयात “सिंधुदुर्ग कला अकादमी”ची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी प्रयत्न…

लोकराजा सुधीर कलिंगनांचा पुढाकार; दशावतारा सोबत भजन, फुगडी, कळसूत्री बाहुल्यां कलाकारांचा असणार समावेश…

कुडाळ :

भजन, फ़ुगाड्या,कळसुत्री बाहुल्या अशा कला पुन्हा एकदा लोप पावत असलेल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन, दशावतार, कीर्तन, चपई नृत्य, फुगडी, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सिंधुदुर्ग कला अकादमी सुरू करण्याचा मानस जिल्ह्यातील काही
कलाप्रेमींना व्यक्त केला आहे. अकादमीच्या माध्यमातून दुर्लक्षित राहिलेल्या कलाप्रकारांसह कलाकाराला समाजात स्थान मिळावे, त्याचा योग्य पद्धतीने सन्मान व्हावा, भविष्यात त्यांना कोणत्याही समस्या निर्माण होऊ नये, कलाकारांच्या कले सोबत कलेला ही माध्यम मिळावे. या पार्श्वभूमीवर ही कला अकादमी स्थापन करण्यात येणार आहे. असे अनेक उद्देश लक्षात घेऊन लोप पावणा-या कलांना जीवंत ठेवण्यासाठी कला अकादमी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संबंधीत काही महत्वाचे निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. त्या बैठकीत याबाबत पुढील भूमिका ठरवून निर्णय घेण्यात येणार आहे. ही बैठक रविवार दिनांक ११ ऑक्टोंबर 2020 रोजी कुडाळ येथील वासुदेवानंद सरस्वती सभागृहात ठीक १० वाजता होणार आहे. यावेळी या बैठकीला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एम.के.गावडे, मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर, निवृत्त सनदी अधिकारी अशोक पाडावे, कुडाळ येथील कलाप्रेमी बापू नाईक यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. या वेळी उपस्थित राहून पुढील भूमिका ठरवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे आवाहन ज्येष्ठ दशावतार कलाकार लोकराजा सुधीर कलिंगण यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा