You are currently viewing फोंडाघाटचा औद्योगिक दृष्ट्या विकास करूया..! आमदार नितेश राणे 

फोंडाघाटचा औद्योगिक दृष्ट्या विकास करूया..! आमदार नितेश राणे 

फोंडाघाट ग्रामपंचायत भवनचे आमदार नितेश राणे यांचे हस्ते झाले शानदार लोकार्पण

फोंडाघाट

ग्रामपंचायतीच्या १९४१ साली निर्मितीपासून आज २०२२ पर्यंतचा इतिहास पाहताना, त्या निमित्ताने गावच्या भविषष्यावरही चर्चा झाली पाहिजे. फोंडाघाट चा विकास तेवढ्याच गतीने झाला पाहिजे .आणि आजच्या पिढीला त्याच्या भावी २५ वर्षानंतर परिवर्तन पाहावयास मिळाले पाहिजे. त्यासाठी नव्या वास्तूमध्ये प्रयोगशील संकल्पना राबविल्या पाहिजेत.अभ्यास दौरे करून फोंडाघाटच्या विकासाचा प्रस्ताव केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेसाहेब यांचेकडे दिल्यास, ४००कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या कोकम आणि कोकणी मेव्यातून आर्थिक समृद्धी येईल. औद्योगिकतेच्या माध्यमातून इतिहास बदलून हाताला काम मिळेल.असा विश्वास भाजपा आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

आपला विकास कोण करेल, कोणाच्या मागे खंबीर उभे राहावे याची जाणीव ज्यावेळी फोंडाघाटवासियांना होईल तेव्हा विकासाची परिभाषा बदलेल आणि विकासाची गंगा आपोआप प्रवाही होईल.त्यासाठी आमचं काय चुकतं, याच्या विचारमंथनासाठी मी केव्हाही तयार आहे. प्रेम- आपुलकी राणेकुटुंबीयांची फोंडाघाट वर आहेच. त्यामुळे विकास कामात मी कधीही कमी पडणार नाही असा शब्द आमदार नितेश राणे यांनी फोंडाघाट ग्रामपंचायत भवनाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना दिला. सरपंच, ग्राम विकास अधिकारी व कर्मचारी यांच्या कालावधीतील कामाचा त्यांनी गौरव केला. सरपंच संतोष आग्रे यांनी ग्रामपंचायत इमारतीचे काम पूर्ण करून आपल्या कारकिर्दीतील मैलाचा दगड तयार केला आहे. लोकशाहीच्या वटवृक्षाच्या आपण सर्व फांद्या आहोत आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कारभार पाहतो. येथे येणारा प्रत्येक जण समाधानाने परत जाईल याची खबरदारी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.

असे सांगताना त्यांनी फोंडाघाट बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरण अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. रस्ता हे आर्थिक विकासाकडे नेणारे व दळणवळण सुलभ करणारे असल्याने काळाची गरज ठरणार आहे. त्यासाठी बाजारपेठेतील लोकांनी एकत्र येऊन माझ्यावरील राग काढून टाकावा.तसेच डाव्या कालव्याचा प्रश्न आता माझ्या अखत्यारीत असल्याने तो मी सोडणार अशी ग्वाही दिली. त्यासाठी येथील लोकांनी दृष्टीकोन बदलावा. ठाकरे सरकारने कोकणासाठी केलेल्या चार गोष्टी सांगाव्यात ? अर्थमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिले ६२ कोटी रुपये परत दिले नाहीत. विज बिल न दिल्याने रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. गाव अंधारात लोटण्याचे काम ठाकरे सरकारने केले आहे. खड्डे बुजविण्यासाठी निधी नाही. आणि विरोधक सेनानेते टोल नको म्हणून आंदोलन करतात. त्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आधिच स्थगिती दिली. उद्या सेने वाले नवीन गाड्यांमधून फिरताना दिसतील त्यावेळी समजावे टोल आंदोलन यशस्वी झाले.त्यामुळे विकासकामे व विकास करणाऱ्यांचे पाठीशी खंबीरपणे उभे राहा.येणारी जिल्हा परिषद नारायण राणे यांची असेल, त्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होऊया असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

यावेळी व्यासपीठावर सरपंच संतोष आग्रे,उपसरपंच सुदेश लाड, सभापती मनोज रावराणे, सुरेश सामंत,तुळशीदास रावराणे, राजन चिके, भाई भालेकर,बबन हळदिवे, विश्वनाथ जाधव, नांदगाव- वाघेरी- लोरे -घोणसरी चे विद्यमान सरपंच,नीलिमा प्रभुदेसाई,ग्रामपंचायत सदस्य, प्रशासकीय अधिकारी इत्यादी उपस्थित होते.आपल्या प्रास्ताविकामध्ये माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य सौ. सुजाता राणे यांनी फोंडाघाट ग्रामपंचायतीच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. विविध स्तरावर फोंडाघाट चा नामोल्लेख शिवाय सिंधुदुर्ग- रत्नागिरी चा इतिहास पूर्ण होत नाही. सर्वच क्षेत्रात यश- विकास लक्षणीय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर ४१ पासून आजच्या काळातील माजी सरपंच, ग्राम विस्तार अधिकारी ,जागामालक, इमारत बांधकाम सहकार्य करणारे अभियंता, ग्रामपंचायत कर्मचारी, सदस्य, सरपंच,पत्रकार तसेच व्यवस्थापक समीर भालेकर यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी मनोज रावराणे, मोहन पाताडे,सुरेश सामंत,संतोष टक्के यांनी नूतन वास्तूला शुभेच्छा देताना या प्रशासकीय इमारतीत लोकजागृती- प्रबोधन- सहकार्य आणि समाधानाची अपेक्षा व्यक्त केली.अजित नाडकर्णी यांनी सरपंच यांना कार्यतत्परतेचे घड्याळ भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

संदेश तथा गोट्या सावंत यांनी सरपंच यांच्या कार्याचे कौतुक करताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, डम्पिंग ग्राउंड करिता सहकार्याची ग्वाही दिली. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या गावाला शोभा देणारी वास्तू निर्माण झाली.राणे कुटुंबीयांनी सुमारे १०ते १२ कोटी विकासाची कामे येथे सुरू केली आहेत. त्यामुळे फोंडावासीयांनी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन केले.काम करतो त्या कडेच बोट दाखवले जाते. त्यामुळे नाराज न होता सुंदर स्वप्नवत आणि शाश्वत कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याची मांडणी करण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे.या वास्तूमध्ये फर्निचर साठी निधी उपलब्ध करून देण्याची ही मागणी त्यांनी आमदारांकडे केल

सरपंच संतोष आग्रे यांनी स्वप्नपूर्ती झाल्याची भावना व्यक्त करताना आपला अनुभव सांगितला. ताडपत्री ही या सुबक भव्य वास्तूची प्रेरणा असून खचून न जाता हे जिकरीचे काम मी आपणा सर्वांच्या जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे, सौ. सुजाता हळदीवे, गोटया सावंत व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून आणि माझा कार्यकाल पूर्ण होत असताना झाल्याचा आनंद व्यक्त केला. शेवटी आभार बबन हळदिवे यांनी मानले…..

प्रतिक्रिया व्यक्त करा