दळवी फौंडेशनचा सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उपक्रम
इचलकरंजी / प्रतिनिधी
येथील दळवी फौंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून
पंचगंगा नदी घाटावरील दरबार हाॅलमध्ये भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते विजय चव्हाण यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शास्ञशुध्द
पध्दतीने भरतीपूर्व प्रशिक्षण देवून त्यांची पोलीस खात्यात भरती व्हावी ,या उदात्त हेतूने ईश्वर दळवी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित दळवी फौंडेशनच्या वतीने भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले.या प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ आज मंगळवारी सकाळी इचलकरंजी येथील पंचगंगा नदी घाटावरील दरबार हाॅलमध्ये सामाजिक कार्यकर्ते विजय चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व श्रीफळ वाढवून करण्यात आला.
प्रारंभी दळवी फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर दळवी यांनी फौंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.तसेच भरतीपूर्व पोलीस व सैन्य प्रशिक्षण केंद्र सुरु करुन त्यातून देशसेवेसाठी चांगले युवक निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे विजय चव्हाण , मराठी एकीकरण समितीचे जिल्हाध्यक्ष अमित कुंभार ,रामस्वरुप बोहरा , पञकार सागर बाणदार ,
गणेश शर्मा ,इजाज मुजावर , आनंद माळगी आदींनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास विलास शिंदे , शैलेन्द्र पाटील , रजपूत सर ,यश दळवी , केतन सोमन ,आदित्य आरेकर , तानाजी माळी, प्रकाश मगदूम , विरेंद्र खोंद्रे ,तेजस दळवी यांच्यासह अन्य उपस्थित होते.