कणकवली :
मुंबई गोवा महामार्गासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक समस्या मार्गी लागलेल्या नाहीत.सिंधुदुर्ग वासियांना टोलमाफी झालेली नाही, लोकांच्या मागण्या देखील प्रलंबित आहेत. असे असताना देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ जून पासून टोल सुरु करण्याचा घाट घातला जात आहे. याला नागरिकांचा विरोध असून जर १ जून पासून टोल सुरु कराल तर शिवसेनेशी गाठ आहे असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.
आ. वैभव नाईक म्हणाले, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टोलसाठी काढलेल्या निविदेत देखील अनियमितता असल्याचे दिसून येत आहे. हि अनियमितता दूर करेपर्यत व सिंधुदुर्ग वासियांना टोलमाफी होईपर्यंत सिंधुदुर्ग मध्ये टोल सुरु करू देणार नाही. यासाठी उद्या बुधवार ०१ जून रोजी ओसरगाव टोलनाक्यावर आयोजित केलेल्या आंदोलनात आपण स्वतः शिवसेना नेते संदेश पारकर, सतीश सावंत,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या समवेत उपस्थित राहणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.