प्रस्ताव सादर करण्याचे तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
कुडाळ येथील भाजीमार्केट , मच्छिमार्केट व मालवण येथील मत्स्यालय प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासमवेत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व कुडाळ मालवण नगरपालिकेतील लोकप्रतिनिधी यांची बैठक संपन्न झाली. कुडाळ येथील मच्छिमार्केट प्रकल्पासाठी शासकीय जागा न.पं. कडे हस्तांतरित करणे व कुडाळ येथील भाजीमार्केट, मालवण मस्त्यालय प्रकल्पांच्या भूसंपादनाबाबतची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी अशी सूचना यावेळी आ. वैभव नाईक यांनी केली. त्यावर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कुडाळ येथील शासकीय जागेचे व मालवण व कुडाळ येथील भूसंपादन करावयाच्या जागेचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.
यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, महेश कांदळगावकर, मंदार केणी, कुडाळ नगराध्यक्षा आफरीन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार,मालवण तहसीलदार अतुल पाटणे, नगरविकास अधिकारी अवधूत तावडे, मालवण व कुडाळ नगर पंचायत मुख्याधिकारी संतोष जिरगे, अभय शिरसाट, नगरसेवक उदय मांजरेकर, सहाय्यक संचालक व्ही. टी . देसाई, न. पं. अभियंता होडावडेकर आदी उपस्थित होते.