भाविकांनी विशाल परब यांचे आभार मानत राजकीय वाटचालीसाठी दिला आशीर्वाद..
कुडाळ :
माणगाव खोऱ्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महादेवाचे केरवडे येथे दर सोमवारी सिद्ध महादेवाच्या दर्शनासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावरून तसेच सिंधुदुर्गातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. काल पाऊस येण्यापूर्वीचा शेवटचा सोमवार असल्याने भाविकांची अलोट गर्दी झाली होती. या सर्व भाविकांना मोफत भोजनाची व्यवस्था विशाल परब आणि त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आली यावेळी असंख्य भाविकांनी विशाल परब यांचे दातृत्व महान असून त्यांनी चांगले काम केले असे म्हणत त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी आशीर्वाद दिले.