मराठी बालभारती, थीम सॉंग्स, शॉर्ट फिल्म आदींसाठी विविधरंगी काव्यलेखन केलेल्या नंदुरबार येथील कवयित्री लेखिका सौ.सुनंदा भावसार यांची अप्रतिम काव्यरचना
बाप असतो छत्रछाया तो घराचा ठाम पाया
माय होतो तो कधी अन लेकरांना देत माया
थोर असते मायसुद्धा मी कुठे नाही म्हणाले…
लेखणी का थांबते रे बाप विषयावर लिहाया?
ऊन सुध्दा साहतांना पावसाला झेलताना
बाप येतो नित्य आधी संकटांना तोंड द्याया…
बाप खातो खूप खस्ता सांग ना कोणाचसाठी…?
जन्मभर तो कष्ट घेतो सौख्य सार्यांचे बघाया
*”बाप”* शब्दासारखा तर शब्द नाही अर्थवाही…
त्यामुळे घर शांत असते वादळासोबत लढाया !
सौ.सुनंदा सुहास भावसार
90963 49241