You are currently viewing मी माझा….

मी माझा….

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री.अरविंदजी ढवळीकर यांची अप्रतिम काव्यरचना

भास मला हा छळतो मी माझा उरतो आहे
जगताना सरणावरच्या मारणास पाहतो आहे

घर सोडून जावे वाटे एकांत कुठे शोधावा
पाऊल पुढे पडताना कां उगा थांबतो आहे

शोधेल कुणी कां मजला मी निघून गेल्यावरती
मन कोळी विणतो जाळे मी त्यात गुंततो आहे

जाईन कुठे जरी आतां तुटतील पाश कां सारे
घरटे चिमणीचे चारा चोचीतिल दिसतो आहे

हे बंध मोह ही माया क्षण एक दूर मी करतो
तो देवघरातुन कृष्णसखा ते पाहुन हसतो आहे

ओढ जीवनी कळली तो स्पर्श फुलांचा होता
आयुष्यच एक दिसाचे तरी गन्ध पसरतो आहे

हे असेच होते असेच आहे असेच चालत राहे
प्रश्नातच उत्तर मिळते मग शोध थांबतो आहे

उंबरा घराचा नावडता मग हवा हवासा होतो
अडखळतो पाय तिथे चेहरा सखीचा दिसतो

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा