You are currently viewing सांगूळवाडी येथे तरुणाची आत्महत्या

सांगूळवाडी येथे तरुणाची आत्महत्या

सांगूळवाडी येथे तरुणाची आत्महत्या

वैभववाडी

सांगूळवाडी राववाडी येथील सुनील जयेश रावराणे (४७) या अविवाहीत तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. विवाह होत नसल्याच्या नैराशेतून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
सुनील हा आई वडील , भाऊ बहीण यांच्या सोबत रहात होता. सांगूळवाडी येथे त्यांचं व त्यांच्या चुलत्यांची अशी स्वतंत्र दोन घरे आहेत. सध्या त्याचे कुटुंब चुलतीच्या घरात राहत होते. दुपारी जेवण केल्यानंतर घरातील इतर माणसे चुलतीच्या घरात असताना त्याने स्वतःच्या घराच्या लोखंडी बारला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला. त्यात त्याचा मृत्यू झाला.
अधिक तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा