You are currently viewing कुडाळ तालुक्यात 15 ठिकाणी कंटेन्मेंट झोन….

कुडाळ तालुक्यात 15 ठिकाणी कंटेन्मेंट झोन….

सिंधुदुर्गनगरी :  

कुडाळ तालुक्यातील ओरोस, सावंतवाडा, जाधववाडी, घर क्र. 1086 व सावंतवाडा घर नं. 524 च्या 50 मीटर परिघामध्ये दिनांक 9 ऑक्टोबर 2020 पर्यंत. ओरोस, जैतापकर कॉलनी, रामेश्वर अपार्टमेंट, डी. विंग, दुसरा मजला दिनांक 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत,कसाल तेलीवाडी, घर नं. 1115 च्या 50 मीटर परिघामध्ये दिनांक 11 ऑक्टोबर 2020 पर्यंत, पावशी बौध्दवाडी, घर नं. 686 च्या 50 मीटर परिघामध्ये दिनांक 11 ऑक्टोबर 2020 पर्यंत, रानबांबुळी, पोलीस वसाहत, इमारत क्र. 303 व पणदूर तिठा, मयेकरवाडी,साई-रामेश्वर सोसायटी, फ्लॅट नं. 13 परिसर दिनांक 11 ऑक्टोबर 2020 पर्यंत,साळगाव-जांभरमळा, निवलीचे टेंब घर नं. 361च्या 50 मीटर परिघामध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2020 पर्यंत, वेताळ बांबर्डे, आंगणेवाडी घर नं. 1218 च्या 50 मीटर परिघामध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2020 पर्यंत, नेरुर कर्यात, नारुर (हळदीचे नेरुर), मधलीवाडी, घर नं. 407 च्या 50 मीटर परिघामध्ये, पोखरण, बौध्दवाडी, घर नं. 338 च्या 50 मीटर परिघामध्ये, तेंडेली, खालची आदोस च्या 50 मीटर परिघामध्ये, वारंगाची तुळसुली, बुडक्याचीवाडी,घर नं. 426 च्या 50 मीटर परिघामध्ये, दिनांक 13 ऑक्टोबर 2020 पर्यंत, ओरोस, बोरभाटवाडी,घर नं. 1329 च्या 50 मीटर परिघामध्ये, दिनांक 14 ऑक्टोबर 2020 पर्यंत, कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोन संबंधित दिनांकापर्यंत रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळाच्या उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे  यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा