कणकवली तालुका सरपंच संघटनेचा निवेदनाद्वारे इशारा…!
कणकवली
कणकवली तालुक्याती गावात स्ट्रीट लाईट चा विद्युत पुरवठा गेले आठ दिवस बंद आहे.त्यामुळे आज कणकवली सरपंच संघटनेच्या वतीने कणकवली पंचायत समिती बी डी ओ व वीज वितरण अधिकार्यांची भेट घेतली. यावेळी सरपंच यांनी गावातील स्ट्रीट लाईट संदर्भात आपले निवेदन बीडीओ अरुण चव्हाण व महावितरण कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना देत पुढील आठ दिवसात स्ट्रीट लाईट सुरु न झाल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा देखील या सरपंच संघटनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी मिलिंद मिस्त्री, हेमंत परुळेकर अफ्रॉजा नावलेकर,पांढरी वायगणकार, मनाली गुरव, संतोष राणे,सुहास राणे,महेश शिरवलकर,वासुदेव कर्णीक, ऋतिक सावंत,गीता तेली,आरेकर,सुनिद्र सावंत,गुरुदास चव्हाण,अशोक बोबाटे, सुजाता जाधव,शीतल जाधव,संदीप मेस्त्री, समीर प्रभुगावकर, संदीप सावंत, भाई आंबेरकर आदी उपस्थित होते
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले की, कणकवली तालुक्यातील प्रत्येक ग्रामिण भागातील स्ट्रीट लाईट विज बिल सुरुवातीला जि.प.मार्फत शासनाच्या आलेल्या अनुदानानुसार भरली जात होती. मात्र मार्च 2019 पासून राज्यशासनाने गेले दोन ते तिन वर्ष ग्रामिण भागातील स्ट्रीट लाईट विज बिलापोटी महावितरण कंपनीला अदा न केल्याने या थकीत बिला पोटी सर्व ग्रामपंचायतीचा विज पुरवठा खंडीत केलेला आहे. प्रत्येक ग्रा.पं.चे जवळपास सरासरी 8 ते 10 लाखापर्यंत असल्याने गेल्या आठवडयापासून विज कन्केशन तोडण्यास सुरुवात केली. आहे. यामुळे ऐन मे महीन्यामध्ये मुंबईकर चाकरमानी तसेच गावातील नागरीकांना गावात फीरताना अधारातून चाचपडत बाहेर पडावे लागत असून संपूर्ण गाव अंधारमय झालेली असुन काळोकाचा फायदा घेत गावोगावात चोरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासन व महावितरणच्या या भांडणात ग्रामिण भागातील सिंधुदूर्ग पर्यटन असलेला जिल्हयातील ग्रामपंचयात स्तरावरील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेव व ग्रा.पं.सदस्य आणि ग्रामपंचयात कर्मचा-यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे जागत आहे. ग्रामिण भागातील जनतेसाठी सर्व सरंपच वेळ पडल्यास जनतेसह रस्त्यावर उतरू तिव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा कणकवली तालुका सरपंच संघटनेच्या वतीने विज अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.