You are currently viewing ३१ मे रोजी वैभववाडी पोलीस स्टेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

३१ मे रोजी वैभववाडी पोलीस स्टेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

वैभववाडी :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्रसारित झाले. त्याची दखल घेत व पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या वैभववाडी पोलीस ठाण्याचा यशस्वीरीत्या कार्यभार संपुष्टात येत असून ते वेंगुर्ला येथील पदभार स्वीकारणार आहेत. त्या निमित्ताने एक सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा देण्याच्या उद्देशाने राजेश मो. पडवळ चॅरिटेबल ट्रस्ट वैभववाडी व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने वैभववाडी पोलीस स्टेशनच्या वतीने वैभववाडी पोलीस स्टेशन येथे मंगळवार दि. ३१ जून, २०२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

ज्या रक्तदात्यांना रक्तदान करावयाचे आहे त्यांनी मारुती साखरे ७७७६०७४३६०, अजित पडवळ ९४२३३००२०४ यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावयाची आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्तपेढी मधील रक्तपुरवठा वाढीसाठी वैभववाडी तालुक्यातील नागरिकांनी व विशेषतः तरुण वर्गाने आवर्जून रक्तदान करावे, असे आवाहन राजेश पडवळ चॅरिटेबल ट्रस्टचे राजेश पडवळ, मंदार चोरगे व मंगेश चव्हाण यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा