You are currently viewing तोडलेल्या झाडांची नुकसानी भरपाई मिळण्यासाठी जिल्हाधिका-यांना निवेदन

तोडलेल्या झाडांची नुकसानी भरपाई मिळण्यासाठी जिल्हाधिका-यांना निवेदन

वेंगुर्ला

विद्युत कंपनीने आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना न देता विज वाहिनी नेताना आमची उत्पान्नाची असलेली काजूची झाडे मुळासकट तोडली आहेत. याबाबत संबंधित कार्यलयाशी विचारणा करुनही त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. त्यामुळे आपण प्रत्यक्ष पहाणी करुन आम्हाला नुकसान भरपाई मंजूर करावी आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई अशा आशयाचे लेखी निवेदन वेतोरे-सबनीसवाडा येथील रहिवासी सुमित्रा सदानंद गावडे व निलेश सदानं गावडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केला आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वेतोरे येथील गट क्र. व उपविभाग ५३८, क्षेत्र ३.५०.०० ही जमिन आम्ही व इतर सहहिस्सेदार यांचे नावे असून त्यापैकी ०.३१.८० एवढे क्षेत्र आमचे मालकीचे आहे. या क्षेत्रामध्ये आम्ही उत्पन्न देणारे काजू कलमांची लागवड केलेली आहे. तसेच या क्षेत्रामधून महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीची उच्च दाबाची (३३ केवी) वीज वाहिनी गेलेली आहे. १६ मे २०२२ रोजी आम्हाल कोणतीही पूर्वकल्पना न देता आमची उत्पन्न देणारी लागती झाडे मुळासकट तोडून आमचे अपरिमित नुकसान केले आहे. याबाबत विद्युत कंपनीच्या अधिका-यांशी प्रत्यक्ष वेंगुर्ला व कुडाळ येथील कार्यालयात विचारणा केली असता त्यांनी ‘तुम्हाला काय करायचे आहे ते करा‘ अशी उडवाउडवीची उत्तरे दिली.

आमच्या काजू कलमांमुळे वाहिनीस अडथळा होणार होता तर त्याची पूर्वकल्पना आम्हाला देऊन अडथळा निर्माण करणा-या फांद्याच छाटल्या असत्या तर आमचे नुकसान टाळता आले असते. एकिकडे शासन पर्यावरणाच्यादृष्टीने झाडे लावा, झाडे जगवाचा संदेश देत आहेत. पण त्याच्या विरुद्ध अशी कृती विद्युत कंपनीने केली आहे. झाड मुळासकट तोडल्यामुळे आमचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले असून आपण किवा आपल्या प्रतिनिधींमार्फत प्रत्यक्ष पाहणी आमच्या नुकसानीची नुकसान भरपाई मंजूर करावी. तसेच संबंधितांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करावी असे निवेदनात सुमित्रा सदानंद गावडे व निलेश सदानंद गावडे यांनी नमुद केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा