सावंतवाडी:
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासकेंद्राच्या कार्यपद्धतीचे मूल्यमापन पहाणी समितीमध्ये विषय तज्ञ म्हणून तुषार वेंगुर्लेकर यांची निवड करण्यात आली आहे. अभ्यास केंद्राच्या कार्यपद्धतीचे नियंत्रण करण्यासंदर्भात संचालक विद्यार्थी सेवा विभागाच्या आदेशानुसार अभ्यास केंद्राची पाहणी करून त्यांच्या कार्यपद्धतीचे मूल्यमापन करायचे आहे. या पाहणीत समितीमध्ये विषय तज्ञ म्हणून डॉ. जे. बी.नाईक आर्टस् ॲण्ड कॉमर्स कॉलेजद्वारा आरपीडी ज्युनि. कॉलेजचे केंद्रप्रमुख वेंगुर्लेकर यांची निवड करण्यात आलेली आहे.
तुषार वेंगुर्लेकर यांच्या निवडीने सिंधुदुर्ग जिल्ह्याला योग्य प्रतिनिधित्व मिळाले आहे.गेली २५ वर्ष यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ज्ञानगंगा घरोघरी पोहचवविण्याचे पवित्र कार्य करत आहेत. यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.