You are currently viewing सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निवृत्त निरीक्षक शंकर पाटील यांचे अपघाती निधन…

सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निवृत्त निरीक्षक शंकर पाटील यांचे अपघाती निधन…

सावंतवाडी

येथील पोलीस ठाण्याचे निवृत्त पोलिस निरीक्षक शंकर पाटील (६३) रा. पन्हाळा-कोल्हापूर, यांचे अपघाती निधन झाले. याबाबतची माहीती त्यांचे पुतणे राम पाटील यांनी दिली. त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. ते आपल्या दुचाकीने जात असताना बोलेरोने त्यांना धडक दिली होती. त्यात ते गंभीर जखमी झाले होते.
शंकरराव पाटील हे ३१ मे २०१७ रोजी सावंतवाडी पोलीस ठाण्यातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले होते. त्यानंतर ते आपल्या गावी राहत होते. सध्या ते एल. एल. बीचे शिक्षण घेत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा