You are currently viewing टोलवसुली विरोधात भाजपा व प्रकल्पग्रस्त आक्रमक; ओसरगाव टोल कार्यालयाला ठोकले टाळे

टोलवसुली विरोधात भाजपा व प्रकल्पग्रस्त आक्रमक; ओसरगाव टोल कार्यालयाला ठोकले टाळे

महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पग्रस्त असलेले जमीन मालक सुद्धा झाले आक्रमक

ओसरगाव टोलनाक्यावर वातावरण तणावपूर्ण

कणकवली

मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणावर ओसरगाव येथे टोलवसुलीचे काम सुरू करणार असल्याने भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले. टोल वसुली करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत कंपनीने सुरू केलेल्या कार्यालयाला थेट टाळे ठोकले.
ज्या ठिकाणी कंपनीने कार्यालय सुरू केले आहे ती जागा स्थानिक ग्रामस्थांची असताना त्या जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे या जागेवर दंडात्मक कारवाईच्या नोटिसा जमीनमालकांना येत आहे. या घटनेचा निषेध करत जोपर्यंत महामार्गाची अपूर्ण कामे पूर्ण होत नाहीत आणि जमीन मालकांचा मोबदला मिळत नाही.तोपर्यंत टोल सुरू करायचा नाही. असा इशारा देत भाजपा कार्यकर्ते व जमीन मालक यांनी टोल कार्यालयाच्या गेटला टाळे ठोकले.

या घटने नंतर टोल नाक्यावर आज शुक्रवारी पुन्हा तणावपूर्ण वातावरण होते. यावेळी एम. डी. करीमुनसा हैदराबाद या ठेकेदार कंपनीचे व्यवस्थापक अमोल तळसकर, सचिन पडवळ, धवल कुलकर्णी, महामार्ग प्राधिकरणचे शाखा अभियंता एम.आर.साळुंखे, यांच्यासोबत स्थानिक ग्रामस्थांनी भाजपा पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली व टोलवसुलीला आपला विरोध असल्याचे मत नोंदवले.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी सभापती मनोज रावराणे, युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, अवधूत तळगावकर,कळसुली उपसरपंच सचिन पारधीये, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, संतोष चव्हाण, पप्पू पुजारे, समीर प्रभुगावकर, सदा चव्हाण, पप्पू पुजारे, राजन चिके, स्वप्नील चिदरकर, विजय चिदरकर, भाई मोरोजकर, गजानन तळेकर, पार्वती सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा